प्रतिनिधी: राम थोरात
तुळजापूर:-अवघ्या कमी कालावधीत सामाजिक कार्यात नावारूपास आलेल्या भिम-अण्णा सामाजिक संघटनेचा ३रा वर्धापन दिन शासकीय विश्राम गृह तुळजापूर येथे मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला.
यावेळी कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणुन तुळजापूर पोलिस स्टेशनचे पोलिस निरीक्षक आजीनाथ काशिद साहेब तसेच प्रमुख वक्ते म्हणून परिवर्तन सामाजिक संस्था चे संस्थापक सचिव मारूती बनसोडे सर उपस्थित होते.आजच्या दिवशी वीर फकिरा यांची जयंती असल्याने वीर फकिराच्या प्रतिमेचे पूजन करून कार्यक्रमाची सुरूवात केली.
यावेळी भिम-अण्णा सामाजिक संघटनेचे संस्थापक अध्यक्ष सुरेश (आप्पा)भिसे,संस्थापक सल्लागार समिती प्रमुख दत्ता कांबळे,तानाजी कांबळे,मच्छिंद्र क्षिरसागर,मानवहित लोकशाही पक्षाचे जिल्हा युवक अध्यक्ष किरण कांबळे,बहुजन स्वाभिमान संघटना संस्थापक अध्यक्ष संजय नाना शितोळे,शिवसेना सोशल मिडिया तालुका प्रमुख चेतन बंडगर ,भिम-अण्णा सामाजिक संघटना लातूर जिल्हा अध्यक्ष अमर कांबळे,औसा तालुका अध्यक्ष मयुर साळुंके,तुळजापूर तालुका अध्यक्ष राम कांबळे ,तालुका उपाध्यक्ष आकाश शिंदे,ऋतिक पारधे,किरण पारधे,कुमार सुरवसे,महादेव मोरे महाराज,अनिल देडे,विकास भिसे,युवराज भिसे,विकी झोंबाडे,विशाल शेंडगे,अक्षय झोंबाडे,दिपक भिसे,सज्जन झोंबाडे ,अजय झोंबाडे,आकाश भिसे,तुषार भिसे,नंदकुमार भिसे,शेखर भिसे आदी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
0 टिप्पण्या