प्रतिनिधी: सयाजी पाटील
मुरुड: लातूर जिल्ह्यातील मुरुड येथील ग्रामदैवत श्री मुरुडेश्वर देवस्थान मुरुड येथील मनमानी कारभार व भ्रष्टाचार थांबवण्यासाठी मुरुड गावातील विष्णुपंत घुट्टे,विष्णुदास नाडे तसेच समस्त मुरुडकर यांच्या वतीने १ मार्चपासून छत्रपती शिवाजी महाराज चौक मुरुड येथे आमरण उपोषण करण्यास सुरुवात करण्यात आली आहे. यामध्ये उपोषण करते यांचे प्रमुख मागण्या आहेत की, १) मुरुडेश्वर देवस्थान मधील भ्रष्टाचार थांबवण्यासाठी स्वयघोषित अध्यक्ष कर्ण माणिक पुदाले व बेकायदेशीर विश्वस्त यांना तात्काळ हटवण्यात यावी.
२) ग्रामदैवत श्री मुर्डेश्वर देवाची जमीन मिळकत गट क्रमांक ५९७ मधील क्षेत्र ४२ एकर ३९ गुंटे अतिक्रमण मुक्त करून देवस्थानाचे पावित्र्य राखण्यासाठी कायदेशीर कारवाई करण्यात यावी.
३) देवस्थानाच्या जमिनीत बेकायदेशीरपणे अतिक्रमण करणाऱ्या ग्रामपंचायत मुरुडणे संरक्षण देऊ नये व त्या ठिकाणी सोयी सुविधा देऊन त्यांच्या बेकायदेशीर कुत्त्यास मदत करू नये.
या प्रमुख मागण्यासाठी आमरण उपोषण करण्यास सुरुवात करण्यात आली आहे. उपोषणकर्त्याकडून असे सांगण्यात आले आहे की प्रशासनाने तात्काळ आमच्या मागण्याची दखल घेऊन दोषीवर योग्य ती कारवाई करण्यात यावी.
प्रशासन यांच्या उपोषणाकडे कधी लक्ष देणार याकडे समस्त ग्रामस्थांचे लक्ष लागले आहे.
0 टिप्पण्या