Ticker

6/recent/ticker-posts

काक्रंबा येथे क्रिकेट स्पर्धा विजेत्या संघाला पारितोषिक वितरण


प्रतिनिधी: अहमद अन्सारी 

काक्रंबा:- तुळजापूर तालुक्यातील काक्रंबा येथे (दि.१८) झालेल्या क्रिकेट स्पर्धेत मुळेगाव तांडा येथील न्यू क्रिकेट क्लब ने ३१ हजार रुपयांचे प्रथम पारितोषिक पटकावले तर काक्रंबा येथील सहारा क्रिकेट क्लब ने २१ हजार रुपयाचे द्वितीय पारितोषिक पटकावले व बावी येथील जय हिंद क्रिकेट क्लब तृतीय स्थानी राहिला.

स्पर्धेत एकूण २६ संघानी सहभाग नोंदवला होता प्रथम संघाला माजी जिल्हा परिषद सदस्य बालाजी भाऊ बंडगर यांच्या हस्ते बक्षीस वितरण करण्यात आले तर द्वितीय संघाला काक्रंबा गावचे सरपंच कालिदास खताळ यांच्या हस्ते व तृतीय संघाला अजिज पटेल यांच्या हस्ते बक्षीस वितरण करण्यात आले

यावेळी काक्रंबा गावचे युवा नेते नंदकुमार देवगुंडे,माजी तंटामुक्त अध्यक्ष करीम अंसारी,अशोक कंदले,व्यंकट झाडे,माजी सरपंच अमृत झाडे,शहाजी देवगुंडे,बबलू घोगरे,हरिदास वट्टे,तय्यब अन्सारी,सद्दाम अन्सारी,खालेद अन्सारी,समाधान देवगुंडे तसेच सहारा क्रिकेट क्लबचे सर्व सदस्य व गावकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या