प्रतिनिधी : राम थोरात
मुंबई: आरोग्य भवन मुंबई येथे महाराष्ट्र राज्य आरोग्य प्रशासकिय कर्मचारी संघटना, आरोग्य मिनिस्ट्रीयल कर्मचारी संघटना, महाराष्ट्र शासकीय निमशासकीय लिपिक हक्क परिषद, जुनी पेन्शन हक्क संघटना यांच्यावतीने आरोग्य भवनातील सर्व कर्मचारी बंधू भगिनीनी बक्षी समिती खंड २ चे दहन करून निषेध केला.
शासनाने नुकताच बक्षी समिती खंड २ प्रसिध्द केला. आरोग्य सेवा आयुक्तालया कडुन तसेच आरोग्य प्रशासकिय कर्मचारी संघटना व विविध विभागानी लिपिक सवर्गासाठी समान काम समान वेतन या तत्वावर पदोन्नती टप्पे कमी करुन वेतनश्रेणी सुधारित करणेबाबत बक्षी समितीस प्रस्ताव सादर करण्यात आला होता. सदर प्रस्तावाच्या अनुषंगाने बक्षी समितीने याबाबत कोणताच निर्णय न घेता लिपिक सवर्गिय कर्मचाऱ्यांच्या तोंडाला पाने पुसली. या अन्याय कारक निर्णयाचा निषेध करणेकरीता व आपल्या मागण्या मान्य करण्यास शासनास भाग पाडण्या करीता राज्यातील पुकारलेल्या आंदोलनात सहभागी होऊन शासनास जाग आणण्यासाठी दि.२२/०२/२०२३ रोजी आरोग्य भवन इमारतीच्या पटांगणात बक्षी समितीचा खंड २ चे दहन करुन निषेध व्यक्त करान्यात आला.
तसेच आपला अत्यंत महत्वाचा मुद्दा जुनी पेन्शन लागू करणे या मागण्या मान्य झाल्या पाहिजेत यासाठी निदर्शने करयात आले. जो पर्यंत लिपिक सवर्गाला न्याय मिळत नाही तो पर्यंत लिपिक स्वस्थ बसणार नाही. प्रत्येक कार्यालयात बक्षी समिती खंड २ चे दहन करून हे आंदोलन राज्यभर अधिक तीव्र करण्यात येत आहे.
या प्रसंगी लिपीक हक्क परिषद चे राज्यअध्यक्ष श्री. विजयजी बोरसे, जूनी पेन्शन हक्क संघटनेचे वितेशजी खांडेकर, आरोग्य प्रशासकिय कर्मचारी संघटनेचे श्री.प्रवीण नगराळे, श्री.भाऊ शिनलकर, श्री. जितेंद्र नागवेकर, श्री. विजय पोस्तुरे, श्री.अजिंक्य सोनार, श्री.लोखंडे, भाऊ भांगरे तसेच जिल्हा परिषद लिपीक संघटनेचे गिरीषजी दाभडकर, श्री.मारुती जाधव, श्री उमाकांत सुर्यवंशी, श्री.पंकज गुल्हाणे, आदी प्रमुख कार्यकर्त्यांसह सर्व लिपिक बंधू भगिनी मोठया संख्येने उपस्थित होते.
0 टिप्पण्या