पुणे जिल्हा प्रतिनिधी : प्रवीण मोरे
मुंबई : शिवसेनेतील बंडांनंतर शिंदे आणि ठाकरे अशा दोन्ही गटातील माणसांनी शिवसेनेचे चिन्ह 'धनुष्यबाण' यावर हक्क सांगितला आहे. याबाबत आता निवडणूक आयोग निर्णय घेणार आहे.
केंद्रीय निवडणूक आयोगाकडून ठाकरेंना आपली बाजू मांडण्यासाठी ५ ऑक्टोबरपर्यंत वेळ देण्यात आलीय. पोटनिवडणुकीपूर्वी धनुष्यबाणाचा पेच सोडवायचा असल्यामुळे लवकरात लवकर निर्णय घेणे गरजेचे आहे असे सांगून निवडणूक आयोगाने हा आदेश दिला आहे.
त्यामुळे एकीकडे दसरा दुसरीकडे धनुष्यबाणावर पुन्हा हक्क मिळवणे या दोन्ही गोष्टींसाठी उद्धव ठाकरेंना मेहनत घ्यावी लागणार आहे.
निवडणूक आयोग नेमकं चिन्ह कोणत्या गटाला देणार का चिन्ह गोठवलं जाणार हे पाहणे महत्त्वाचे आहे. आता याबाबतचा निर्णय निवडणूक आयोग कधी घेणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
0 टिप्पण्या