Ticker

6/recent/ticker-posts

लातूर - उदगीर हायवे वर भीषण अपघात ; जागीच ५ जण ठार तर १० जण जखमी

लातूर तालुका प्रतिनिधी : मुदस्सर शेख

लातूर : लातूर जिल्ह्यातील उदगीर लातूर  रस्त्यावरील हैबतपुर पाटी नजीक आज सकाळी ८.३० वाजेच्यासुमारास एक कार आणि एसटीचा भीषण अपघात झाला. या अपघातात पाच जणांचा जागीच मृत्यू झाल्याची प्राथमिक माहिती उपलब्ध झाली आहे. या अपघातात बसमधील अनेक प्रवासी जखमी झाल्याचे देखील माहीती समजत आहे. मयत हे तुळजापूर येथील भवानी मातेच्या दर्शन करुन गावी परत होते अशी माहिती आहे. 


राज्य परिवहन महामंडळाची बस क्रं - एम.एच १४ बी.टी १३७५ उदगीरहून लातूरला जाणा-या बसचा आणि एम.एच - २४ ए.बी ०४०८ क्रमांकाची स्विफ्ट डिझायर कारचा हैबतपूर पाटी जवळ अपघात झाला. हा अपघात इतका भीषण हाेता की बसचं पुढचे चाक निखळले तर चार चाकीचा पुढचा भागाचा संपुर्णत: चेंदामेंदा झाला आहे.


या अपघाताची माहिती समजताच घटनास्थळी स्थानिकांनी धाव घेतली. तसेच उदगीर ग्रामिणचे पाेलीस देखील पाेहचले. सर्वांनी मिळून बचाव कार्यास प्रारंभ केला. काही जखमींना प्रथमाेउपचार दिले. दरम्यान या अपघातात अलोक तानाजी खेडकर (रा. संत कबीर नगर,उदगीर),अमोल जीवनराव देवक्तते (रा. रावनकोळा), कोमल व्यंकट कोदरे (रा. डोरणाळी ता. मुखेड), यशोमती जयवंत देशमुख (रा. यवतमाळ) , नागेश ज्ञानेश्वर गुंडेवार (रा. बिदर रोड, उदगीर) यांचा अपघातात जागीच मृत्यू झाला आहे. प्रियांका गजानन बनसोडे (रा. एरोळ ह मु गोपाळ नगर, उदगीर) या गंभीर जखमी झाल्या आहेत.


 या अपघातात बसमधील १० जण जखम झाले आहेत. या अपघातामधील जखमींना उदगीर येथील शासकीय रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. दरम्यान अपघातग्रस्त चार चाकीमधील प्रवासी हे तुळजापूर येथून देवीचं दर्शन घेऊन परतत असताना हा अपघात झाला.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या