नळदुर्ग प्रतिनिधी :- मन्सूर शेख
तुळजापूर:तुळजापूर तालुक्यातील होर्टी येथे युवा नेते गणेश अण्णा खराडे यांच्या वाढदिवसा निमित्त सिद्धरामप्पा खराडे यांच्या मार्गदर्शनाखाली होर्टी परिसरात ग्रामपंचायत कार्यालय येथे मोफत आधार कार्ड दुरुस्ती शिबिराचे आयोजन करण्यात आले होते.
आज होर्टी येथे या शिबिराचे नागरिकांनी मोठ्या प्रमाणात लाभ घेतला.
यावेळी गावातील 200 नवीन आधार कार्ड व 200 लोकांचे नाव जन्मतारीख बायोमेट्रिक दुरुस्ती करण्यात आली. हे शिबिर सलग तिन दिवस राबवण्यात आला.यशस्वी करण्यासाठी शिवशंकर राजमाने,मन्सूर शेख,ओंकार तूगावे, बाळू वाघमारे,सोमनाथ सराटे,ईश्वर राजमाने,महादेव भातागळे,गणेश साखरे,सचिन मुळे,उमाशंकर राजमाने, दीपक मुळे, बालाजी साखरे, ज्ञानु वर्दे, पिंटू राजमाने, ज्ञानेश्वर राजमाने, निळु राजमाने, विठ्ठल सराटे,वैभव राजमाने यांनी पुढाकार घेतला.
0 टिप्पण्या