कोल्हापूर जिल्हा प्रतिनिधी: मुजफ्फर टिनवाले
कोल्हापूर: कोल्हापूर येथे ( दि.०१ ) रोजी कोल्हापूर शहर जिल्हा युवक काँग्रेस तर्फे कोल्हापुरातील १० वी व १२ वी मधील गुणवंत विद्यार्थी व विद्यार्थिनीचा तसेच राज्यस्तरीय स्तरावर आपल्या कोल्हापूर शहर चे नाव लौकिक करणारे विविध क्षेत्रातील खेळाडू यांचा गौरव सोहळा २०२२ मोठ्या उत्साहात संपन्न झाला. या कार्यक्रमास युवक काँग्रेसला ताकद देणारे मा.श्री. सतेज उर्फ बंटी पाटील जिल्हाध्यक्ष कोल्हापूर काँग्रेस कमिटी तथा माजी गृहराज्यमंत्री महाराष्ट्र राज्य, उत्तर विधानसभा आमदार श्रीमती जयश्री जाधव, कोल्हापूर शहर काँग्रेस कमिटीचे मा. श्री. सचिन चव्हाण , काँग्रेस महानगरपालिकेचे गटनेते मा. श्री शारंगधर देशमुख यांच्या मार्गदर्शनाने हा संपूर्ण कार्यक्रम मोठ्या उत्साहात पार पडला. यावेळी प्रमुख पाहुणे विद्यार्थी व पालकांनी आपले मनोगत मांडले व सत्कार कार्यक्रमाबद्दल विद्यार्थी व पालकांनी सतेज पाटील व कोल्हापूर शहर जिल्हा युवक काँग्रेसचे कौतुक केले.
यावेळी मॉन्टी दादा मगदूम, काँग्रेस युवक शहर जिल्हाध्यक्ष उदय मनोहर पवार, दीपक थोरात, शहर अध्यक्ष युवती काँग्रेस अंजली जाधव, दक्षिण विधानसभा युवती अध्यक्ष योगिता चव्हाण, मकरंद कवठेकर, आदित्य कांबळे, सुशांत विभुते, सुरज नाझरे, मुझफ्फर टीनवाले, अमोल चव्हाण, प्रदीप ढाकरे, सुजित प्रभावळे, सुदर्शन तुळसे, अक्षय शेळके, उमेश पाडळकर, जकी मुल्ला, अभी लष्कर, संदीप साठे तसेच सर्व युवक, युवती व पदाधिकारी विद्यार्थी, पालकवर्ग मोठ्या संख्येने या कार्यक्रमास उपस्थित होते.
0 टिप्पण्या