Ticker

6/recent/ticker-posts

एका महिलेचा निघृण पणे खून ; सदरील आरोपीस पोलिसांकडून अटक


कोल्हापूर जिल्हा प्रतिनिधी : मुजफ्फर टीनवाले

कोल्हापूर : कसबा बावडा परिसरातील शहाजीनगर येथे धारदार कोयत्याने गळा कापून महिलेचा निघृण खून केल्याची घटना रविवारी दुपारी घडल्याने खळबळ उडाली. खुनानंतर पळून गेलेल्या संशितास पोलिसांनी पाठलाग करुन ताराराणी चौकात पकडले. घटनास्थळी गनागरीकांनी मोठी गर्दी झाली होती. कविता प्रमोद जाधव (वय ४४, रा. तारळे ता. राधानगरी. जि. कोल्हापूर ) असे खून झालेल्या महिलेचे नाव आहे. तर अटक केलेल्या संशयितांचे नाव राकेश शामराव संकपाळ (वय 32, रा. शहाजीनगर, कसबा बाद ) असे आहे.

रविवारी दुपारी ४ वाजता कसबा बावडा परिसरातील शहाजीनगर येथे संशयित राकेश संकपाळ याने कविता जाधव यांच्यावर धारदार कोयत्याने प्राणघातक हल्ला केला. महिलेचा गळा चिरून त्यांचा खून केला आहे. सदरील महिलेचा खून केल्यानंतर त्याने घटनास्थळावरुन पळ काढला. स्थानिक गुन्हे अन्वेषणच्या पोलीसांनी संशयित राकेश संकपाळ यांचा पाठलाग करून त्याला ताराराणी चौकात पकडले. व आरोपीने गुन्ह्याची कबुली दिली आहे. या घटनेने परिसरात खळबळ उडाली आहे.

सदरील खून कोणत्या कारणाने करण्यात आला आहे व त्या पाठीमागचे कारण काय आहे. याचा पुढील तपास पोलीस करत आहेत.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या