Ticker

6/recent/ticker-posts

थेरगाव संचेती शाळेसमोरील क्रांतीवीर नगर मधील हातभट्टी दारू बंद करा निवेदनाद्वारे उपमुख्यमंत्री तथा गृहमंत्री देवेंद्र फडवणीस यांच्याकडे मागणी

पुणे जिल्हा प्रतिनिधी : प्रवीण मोरे

पुणे : पुणे येथे ( दि.०६ ) रोजी महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री तथा गृहमंत्री मा.ना. देवेंद्र फडवणीस त्यांना पोस्टाच्याद्वारे निवेदन पाठवण्यात आले आहे. त्यांना पिंपरी - चिंचवड महानगरपालिकेच्या हद्दीतील थेरगाव येथील श्री. शरद कुंडलिक बारणे व श्री. संभाजी बाळासाहेब बारणे यांच्या वतिने पोस्टाद्वारे निवेदन देण्यात आले आहे. निवेदनात असे सांगण्यात आले आहे की पिंपरी चिंचवड शहर पोलिस आयुक्तालयाच्या हद्दीमधील वाकड पोलिस ठाणे हददीमधील थेरगांव येथील क्रांतीवीर नगर भर वस्तीमध्ये संचेती शाळेसमोर येथील भारतीय जनता पक्षाच्या पदाधिका - याचा हातभट्टी दारू विक्रीचा धंदा कित्येक वर्षापासून सुरू आहे.

या विभागातील सर्वसामान्य नागरीक,महिला,लहान मुले,वयस्कर नागरीक भितीच्या छायेखाली वावरत असून सायंकाळी ( ७ ) सातनंतर तर येथे मुक्त फिरू शकत नाही. युपी बिहार सारखी विदारक परिस्थिती या ठिकाणी आहे. या बेकायदा विनापरवाना धंदयामुळे लहान मुलांच्या मानसिकतेवर हि वाईट परिणाम होत आहे. सुशिक्षित व करदाते नागरिक या विभागातून आपले जीवन जगत असताना या बेकायदा धंदयामुळे दुसरीकडे जाऊन राहण्याची इच्छा व्यक्त करीत आहे . तरी आपण योग्य ती कारवाई करावी ही समस्त जनतेच्या वतिने मागणी करण्यात येत आहे.

या निवेदणावर श्री. शरद कुंडलिक बारणे व श्री. संभाजी बाळासाहेब बारणे यांच्या स्वक्षऱ्या आहेत.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या