प्रतिनिधी रुपेश डोलारे उस्मानाबाद
तुळजापूर पोलीस ठाणे : शारदीय नवरात्री उत्सव निमीत्ताने पोलीस अंमलदार- दशरथ सोमनाथ कुंभार, वय 52 वर्षे हे दि. 30.09.2022 रोजी 05.00 वा. सु. तुळजापूर येथील बार्शी त्रिकुट रस्त्यावर कर्तव्यास होते. दरम्यान ढेकरी, ता. तुळजापूर येथील- विनोद रामभाउ तेलंग हे तवेरा कार क्र. एम.एच. 12 डीई 9115 ही चालवत तेथून जात असताना कर्तव्यावरील दशरथ कुंभार यांनी थांबण्याचा ईशारा केला असता विनोद तेलंग यांनी तसे न करता नमूद तवेरा कार ही भरधाव वेगात निष्काळजीपने चालवून दशरथ कुंभार यांना समोरुन धडकावून त्यांच्या शासकीय कामात जाणीवपुर्वक अडथळा करुन त्यांना जखमी केले. यावरुन पोलीस अंमलदार- दशरथ कुंभार यांनी दि. 30.09.2022 रोजी सरकारतर्फे दिलेल्या प्रथम खबरेवरुन भा.दं.सं. कलम- 353, 279, 337 अंतर्गत गुन्हा नोंदवला आहे.
0 टिप्पण्या