तुळजापूर तालुका प्रतिनिधी: प्रतीक भोसले
उस्मानाबाद (धाराशिव) : अखिल भारतीय विद्यार्थी परिषद, धाराशिव च्या वतीने डॉ.बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाचे कुलगुरू प्रा.डॉ.प्रमोद येवले यांना विद्यापीठ उपकेंद्र, धाराशिव येथे खालील विविध सुविधा उपलब्ध करून देण्या संदर्भात निवेदन देण्यात आले.
१) धाराशिव येथील उपकेंद्र सक्षमीकरण करत व विद्यापीठाच्या धर्तीवर ज्याप्रकारे NET-SET व MPSC सारख्या स्पर्धा परीक्षा प्रशिक्षण केंद्र चालू आहे, त्याच प्रकारे उपकेंद्र धाराशिव या ठिकाणी NET-SET व MPSC सारख्या स्पर्धा परीक्षांचे प्रशिक्षण केंद्र चालू करण्यात यावे.
२)मायग्रेशन, पासिंग सर्टिफिकेट धाराशिव येथून देण्याची व्यवस्था करण्यात यावी.
३)२०१७ पूर्वीची डिग्री सर्टिफिकेट येथे मिळत नसल्याने विद्यार्थ्यांचा वेळ प्रवासात जातो. त्यामुळे पदवी प्रमाणपत्र देण्यासाठी पर्यायी व्यवस्थेची सोय करून पदवी प्रमाणपत्र उपकेंद्र धाराशिव येथे देण्यात यावे.
४) विद्यार्थिनींच्या वसतीगृहामध्ये कमाल मर्यादेपेक्षा अधिक विद्यार्थिनींच्या निवासाची व्यवस्था करण्यात आली आहे. यामुळे विद्यार्थिनींना विविध समस्यांना सामोरे जावे लागत आहे. यामुळे विद्यार्थिनींसाठी नविन वसतीगृह देऊन विद्यार्थिनींच्या निवासाची व्यवस्था करण्यात यावी.
५) विद्यार्थी वसतीगृहाचे काम मंजूर झाले असून अद्यापही वसतीगृहाचे काम पूर्ण झालेले नाही, सदरील वसतीगृह येणाऱ्या शैक्षणिक वर्षापर्यंत विद्यार्थ्यांसाठी उपलब्ध करून देण्यात यावे.
अशा विविध मागण्या घेऊन अभाविप धाराशिव चे शिष्टमंडळ कुलगुरूंना भेटले आणि निवेदन दिले. यावेळी वरील सर्व सुविधा लवकरात लवकर उपकेंद्रात उपलब्ध करून देऊ असे आश्वासन कुलगुरू प्रा डॉ. प्रमोद येवले यांनी अभाविप च्या शिष्टमंडळास दिले.
0 टिप्पण्या