Ticker

6/recent/ticker-posts

चोरीच्या रकमेसह आरोपी ताब्यात


 प्रतिनिधी रुपेश डोलारे उस्मानाबाद.

स्थानिक गुन्हे शाखा : उदगीर, जि. लातूर येथील- सोनी माधव केंद्रे, वय 35 वर्षे या दि. 01.10.2022 रोजी 13.30 वा. सु. तुळजापूर येथील श्री तुळजाभवानी मंदीरात दर्शन करुन महाद्वारातून बाहेर येत होत्या. यावेळी गर्दीचा फायदा घेउन एका अनोळखी महिलेने सोनी केंद्रे यांच्या जवळील 1,200 ₹ रक्कम असलेली पर्स हिसकावून चोरुन नेली होती. यावरुन सोनी केंद्रे यांनी तुळजापूर पोलीस ठाणे गाठून भा.दं.सं. कलम- 392 अंतर्गत गुन्हा क्र. 352 /2022 हा गुन्हा नोंदवला आहे.

दरम्यान नवरात्र उत्सवा निमीत्त स्थानिक गुन्हे शाखेचे पथक मंदीर आवार- परिसरात गस्तीस असताना पथकास मिळालेल्या गोपनीय माहितीच्या आधारे व सीसीटीव्ही फुटेज पडताळणी करुन बेलगाव, ता. कर्जत, जि. अहमदनगर येथील- प्रियंका युवराज उर्फ धोंड्या भोसले, वय 37 वर्षे हिस श्री. तुळजाभवानी मंदीर महाद्वार समोरुन ताब्यात घेउन पथकातील महिला पोलीस अंमलदारामार्फत तीची अंगझडती घेउन तीच्या जवळील नमूद चोरीतील रोख रक्कम हस्तगत केली. तसेच पुढील कारवाईस्तव नमूद महिलेस चोरीच्या रकमेसह तुळजापूर पोलीस ठाण्याच्या ताब्यात दिले आहे.

सदरची कामगीरी मा. पोलीस अधीक्षक श्री. अतुल कुलकर्णी यांच्या आदेशावरुन स्थागुशा च्या पोनि- श्री. यशवंत जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली पोउपनि- श्री. संदीप ओहोळ, पोलीस अंमलदार- विनोद जानराव, जावेद काझी, नितीन जाधवर, अजित कवडे, भालचंद्र काकडे, शैला टेळे, अशोक ढगारे यांच्या पथकाने केली आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या