Ticker

6/recent/ticker-posts

भिक्षा प्रतिबंधक कायद्यांतर्गत गुन्हा दाखल


 उस्मानाबाद जिल्हा प्रतिनिधी : रुपेश डोलारे

स्थानिक गुन्हे शाखा : चालू असलेल्या शारदीय नवरात्र उत्सव अनुशंगाने स्थानिक गुन्हे शाखेचे सपोनि- श्री. मनोज निलंगेकर, पोहेकॉ- जावेद काझी, प्रकाश औताडे, काझी, पोना- शौकत पठाण, अशोक ढगारे, महिला पोना- शैला टेळे, पोकॉ- बलदेव ठाकुर यांचे पथक आज दि. 29.09.2022 रोजी तुळजापूर शहरात गस्तीस होते. दरम्यान पथकास श्री तुळजाभवानी मंदीर महाद्वारासमोर एक भिक्षेकरी महिला 16.15 वा. सु. येणाऱ्या-जाणाऱ्या भाविक लोकांकडून भिक मागत असल्याचे निदर्शनास आले. 

यावर पथकाने त्या महिलेस तीचे नाव- गाव विचारले असता तीचे नाव- राधिका शिवा कोळी- धुरमुडगे, वय 22 वर्षे, रा. नळदुर्ग असे सांगीतले. यावर पथकातील महिला पोना- शैला टेळे यांनी त्या महिलेस ताब्यात घेउन तीच्या विरुध्द महाराष्ट्र भिक्षा प्रतिबंध अधिनियम कलम- 5 अंतर्गत तुळजापूर पोलीस ठाण्यात गुन्हा नोदवला आहे. तरी महाराट्र भिक्षा प्रतिबंध अधिनियम 1959 नुसार सार्वजनिक ठिकाणी भीक मागणे हा गुन्हा आहे. अशा प्रकारे भीक मागताना आढळून आलेल्या व्यक्ती कायदेशीर कारवाईस पात्र असून त्यांच्यावर कारवाई करण्यात येईल असे आवाहन मा. पोलीस अधीक्षक श्री. अतुल कुलकर्णी यांनी केले आहे.

सदरची कामगीरी मा. पोलीस अधीक्षक श्री. अतुल कुलकर्णी यांच्या आदेशावरुन स्था.गु.शा. चे पोनि- श्री. यशवंत जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली सपोनि- श्री. मनोज निलंगेकर, पोहेकॉ- जावेद काझी, प्रकाश औताडे, काझी, पोना- शौकत पठाण, अशोक ढगारे, महिला पोना- शैला टेळे, पोकॉ- बलदेव ठाकुर यांच्या पथकाने केली आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या