Ticker

6/recent/ticker-posts

जिल्हाधिकारी कौस्तुभ दिवेगावकर यांची बदली तर नूतन जिल्हाधिकारी म्हणून डॉ. सचिन ओंबासे यांची नियुक्ती


उस्मानाबाद जिल्हा प्रतिनिधी : रुपेश डोलारे

उस्मानाबाद : उस्मानाबाद जिल्ह्याचे जिल्हाधिकारी तथा मंदिर संस्थानचे अध्यक्ष कौस्तुभ दिवेगावकर यांची बदली झाले असल्याची माहिती आत्ताच समोर येत आहे .बदली झाली असल्याचे परिपत्रक दिनांक २९ सप्टेंबर २०२२ रोजी प्राप्त झाले असून सदर ठिकाणी उस्मानाबाद जिल्ह्याचे नवीन जिल्हाधिकारी म्हणून डॉ.सचिन ओंबासे हे उस्मानाबाद जिल्ह्याचे नवीन जिल्हाधिकारी असणार आहेत .

डॉ. सचिन ओंबासे हे कार्यकारी वर्धा येथून उस्मानाबाद जिल्हाधिकारी म्हणून काम पाहणार आहेत तर उस्मानाबाद जिल्ह्याचे माजी जिल्हाधिकारी कौस्तुभ दिवेगावकर यांची बदली करण्यात आली आहे.

विशेष म्हणजे जिल्हाधिकारी दिवेगावकर हे नवरात्राच्या महोत्सव चालू असताना आज पासून सुट्टीवर गेले होते. त्यातच त्यांच्या बदलीचे आदेश आल्याने वेगवेगळे तर्कवितर्क लावण्यात येत आहे.

डॉ. सचिन ओंबासे हे २०१५ च्या बॅचचे आय ए एस अधिकारी असून पुणे येथिल बीजे मेडीकल कॉलेज येथून ते एम बी बी एस झाले आहेत. जिल्हाधिकारी म्हणून त्यांची ही पहीलीच नियुक्ती आहे.

कौस्तुभ दिवेगावकर यांची अचानकपणे बदली झाल्याने सर्वांन मध्ये आश्चर्याचे वातावरण निर्माण होत आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या