23 पैकी 12 महिला व 11 पुरुष
अनुसूचित महिला 2 व
अनुसूचित पुरुष 2
नगर परिषद सार्वत्रिक निवडणूक 2022 यासाठी दिनांक 13 सोमवार रोजी तहसील कार्यालय येथे उपजिल्हाधिकारी तथा निरीक्षक अधिकारी महेंद्र कांबळे व तहसीलदार सौदागर कांबळे तसेच नगर परिषद मुख्याधिकारी श्री नातू यांच्या उपस्थितीत दुपारी 12 वाजता तहसीलदार यांच्या दालनात आरक्षण सोडत कार्यक्रम संपन्न झाला.
तुळजापूर नगर परिषदेच्या या निवडणुकीत 23 सदस्य असून 11 प्रभाग आहेत. त्यानुसार 1 ते 10 प्रभागात 20 सदस्य तर 11 नंबर प्रभाग मध्ये 3 सदस्य असे संख्याबळ आहे.
प्रभाग क्रमांक 2 आणि 8 अनुसूचित महिलासाठी प्रत्येकी एक जागा तर प्रभाग क्रमांक पाच व सहा यात अनुसूचित जाती पुरुष वर्गासाठी प्रत्येकी एक जागा प्रभाग क्रमांक 1,3,4,7,9,10 सर्वसाधारण एक महिला व एक पुरुष तसेच प्रभाग क्रमांक 11 मध्ये दोन सर्वसाधारण महिला व सर्वसाधारण पुरुष एक ज्या प्रभागात अनुसूचित महिला आहे. त्या प्रभागात दुसरी जागा सर्वसाधारण पुरुष व अनुसूचित जाती पुरुष एक तेथे सर्वसाधारण महिला एक असे आरक्षण सोडत काढण्यात आली.
ओबीसी आरक्षण नसल्याने 23 सदस्य पैकी 4 जागा राखीव असून इतर 19 जागा सर्वसाधारणसाठी जाहीर झाल्या या सोडतेवेळेस नगर परिषद शाळा क्रमांक दोन मधील तिसरी वर्गातल्या दोन मुलींनी चिट्ठीद्वारे सोडत काढली यावेळेस नगर परिषदेतील निवडणूक विभागातील आर. एस कांबळे, महादेव सोनार तसेच श्री मिटकरी हे कर्मचारी उपस्थित होते. त्याचबरोबर शहरातील माजी नगरसेवक, राजकीय पुढारी व सर्वसाधारण नागरिक या सोडत कार्यक्रमात हजर होते.
0 टिप्पण्या