Ticker

6/recent/ticker-posts

विर महाराष्ट्र न्युज चॅनेलच्या विविध प्रतिनिधींची निवड जाहीर

आज दिनांक:- १२ जून २०२२ रोजी तुळजापूर येथील शासकीय विश्रामगृह येथे वीर महाराष्ट्र न्यूज चॅनेलच्या विविध प्रतिनिधींची निवड करण्यात आली. यावेळी या कार्यक्रमास प्रमुख उपस्थिती प्रहार जनशक्ती पक्षाचे उस्मानाबाद माजी जिल्हाध्यक्ष केदार सौदागर, रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया रोजगार आघाडीचे प्रदेश उपाध्यक्ष संजय नाना शितोळे, राष्ट्रवादी अल्पसंख्याक विभागाचे तुळजापूर तालुका अध्यक्ष फिरोज पठाण तसेच शहर अध्यक्ष वाहेद शेख यांची होती. आलेल्या सर्व प्रमुख मान्यवरांचे मुख्य संपादक जुबेर शेख यांच्या वतिने पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला त्यानंतर प्रमुख मान्यवरांनी आपआपले मनोगत व्यक्त केले व नुतन चॅनेलला शुभेच्छा देऊन लवकरात लवकर हे चॅनेल मोठ होईल असे सांगण्यात आले. 


चॅनेल कडून शेतकरी, कष्टकरी तसेच सामान्य माणसाला न्याय देण्याचे व आडीआडचनी सोडवण्याचे काम करण्यात येईल अशी अपेक्षा व्यक्त करण्यात आली. तसेच मुख्य संपादक जुबेर शेख, प्रहार जनशक्ती पक्षाचे उस्मानाबाद माजी जिल्हाध्यक्ष केदार सौदागर, रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया रोजगार आघाडीचे प्रदेश उपाध्यक्ष संजय नाना शितोळे, राष्ट्रवादी अल्पसंख्याक विभागाचे तुळजापूर तालुका अध्यक्ष फिरोज पठाण तसेच शहर अध्यक्ष वाहेद शेख यांच्या शुभहस्ते नूतन प्रतिनिधींना नियुक्तीपत्र व पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला.

यावेळी महाराष्ट्र राज्य प्रतिनिधीपदी जावेद शेख , राम थोरात, उस्मानाबाद जिल्हा प्रतिनिधीपदी रूपेश डोलारे, पुणे जिल्हा प्रतिनिधीपदी प्रविण मोरे, तुळजापूर तालुका प्रतिनिधीपदी प्रतिक भोसले, अंदोरा सर्कल प्रतिनिधीपदी सलीम पठाण, नळदुर्ग सर्कल प्रतिनिधीपदी मन्सूर शेख, वृत्तनिवेदीकापदी आशा वाघ, वैष्णवी पोपळे या सर्वांचा यथोचित सन्मान करत नियुक्तीपत्र आणि ओळखपत्र देऊन नियुक्ती करण्यात आली.

यावेळी लातूरचे मुदसर शेख, औसा तालुका उपाध्यक्ष वाजिद पठान ,कार्याध्यक्ष लक्ष्मण राऊत, अंदोरा शाखा अध्यक्ष रमेश शेळके, उपाध्यक्ष एजाज पठाण, रईस शेख, अफताब शेख , बहुजन स्वाभिमान संघटनेचे शरद मस्के , नितीन सोनवणे, गोकुळ मस्के उपस्थित होते.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या