प्रतिनिधी : जुबेर शेख
तुळजापूर : होऊ घातलेल्या जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आठवले गट) पक्षाने महायुतीच्या उमेदवारांना भक्कम पाठिंबा देण्याचे स्पष्ट आवाहन केले आहे. यासंदर्भात नगर परिषद तुळजापूरचे नगराध्यक्ष विनोद (पिटू) भैय्या गंगणे यांना निवेदन देण्यात आले आहे.
या निवेदनात नमूद करण्यात आले आहे की, रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आ) हा देशपातळीवर भारतीय जनता पार्टीसोबत महायुतीचा घटक पक्ष आहे. गल्लीपासून दिल्लीपर्यंत महायुतीसोबत रिपब्लिकन पक्ष ठामपणे उभा असून केंद्रीय सामाजिक न्याय मंत्री रामदास आठवले यांच्या नेतृत्वाखाली हा पक्ष भाजपसोबत समन्वयाने कार्य करत आहे.
आगामी जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकांमध्ये महायुतीचे सर्व उमेदवार बहुसंख्य मतांनी निवडून यावेत, यासाठी रिपब्लिकन पक्षाच्या सर्व कार्यकर्त्यांनी एकसंघपणे काम करावे, असे आवाहन या निवेदनातून करण्यात आले आहे. तसेच महायुतीच्या उमेदवारांच्या प्रचारात सक्रिय सहभाग घ्यावा आणि महायुतीच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहावे, असेही स्पष्ट करण्यात आले आहे.
स्थानिक पातळीवर महायुतीला बळकटी मिळावी, समाजातील सर्व घटकांनी विकासाच्या दृष्टीने एकत्र येणे आवश्यक आहे.
त्यामुळे रिपब्लिकन पक्षाचे कार्यकर्ते, पदाधिकारी व समर्थकांनी कोणताही संभ्रम न ठेवता महायुतीच्या अधिकृत उमेदवारांनाच मतदान करावे, असा संदेश या निवेदनातून देण्यात आला आहे.
या भूमिकेमुळे तुळजापूर तालुक्यासह संपूर्ण जिल्ह्यात महायुतीच्या प्रचाराला अधिक बळ मिळणार असून आगामी निवडणुकीत याचा सकारात्मक परिणाम दिसून येईल, अशी चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे.
या पाठिंबाच्या पत्रावर तानाजी कदम,प्रकाश कदम,अरुण कदम,अमोल कदम,आप्पा कदम,विक्रांत हावळे,समाधान सोनवणे,गोरखनाथ सोनवणे,विष्णू सोनवणे,रवी वाघमारे यांच्या स्वाक्षऱ्या आहेत.


0 टिप्पण्या