प्रतिनिधी : शाम ढेरे
तुळजापूर : तुळजापूर तालुक्यातील मौजे काक्रंबा येथे लोकमाता राजमाता अहिल्यादेवी होळकर यांची जयंती मोठ्या उत्साहात आणि भक्तीमय वातावरणात साजरी करण्यात आली. यानिमित्त गावातील समाजबांधवांनी एकत्र येत राजमाता अहिल्यादेवी होळकर यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले.
कार्यक्रमाची सुरुवात राजमाता अहिल्यादेवी होळकर यांच्या प्रतिमेच्या पूजनाने करण्यात आली. उपस्थित मान्यवरांनी त्यांच्या कार्याचा गौरव करताना समाजकारण, लोककल्याण, न्यायप्रियता आणि महिलांच्या सक्षमीकरणासाठी त्यांनी दिलेल्या योगदानाचा गौरवपूर्ण उल्लेख केला. त्यांच्या विचारांचे अनुकरण करून समाजाच्या सर्वांगीण विकासासाठी कार्य करण्याचे आवाहनही यावेळी करण्यात आले.
या जयंती सोहळ्यास गावचे सरपंच कालीदास खताळ, पोलिस पाटील प्रमोद खताळ, शाम ढेरे, दत्तात्रय देवगुंडे, राजाभाऊ झाडे, सुरेश भिसे, शहाजी ननवरे, हरीभाऊ वट्टे, उमेश खांडेकर, उमेश पाटील, समाधान देवगुंडे, विनोद साबळे, दयानंद वाघमारे, अशोक देवगुंडे, चेतन बंडगर यांच्यासह समाजबांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.
कार्यक्रमादरम्यान राजमाता अहिल्यादेवी होळकर यांच्या जीवनकार्यावर प्रकाश टाकण्यात आला. त्यांच्या आदर्शांमधून प्रेरणा घेऊन समाजहितासाठी कार्य करण्याचा संकल्प उपस्थितांनी व्यक्त केला. जयंतीनिमित्त परिसरात उत्साहाचे वातावरण निर्माण झाले होते.
कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी ग्रामस्थ आणि समाजबांधवांनी विशेष परिश्रम घेतले. शेवटी उपस्थितांचे आभार मानून कार्यक्रमाची सांगता करण्यात आली.

0 टिप्पण्या