Ticker

6/recent/ticker-posts

दहिटणा येथे छत्रपती शिवाजी महाराजांची मान्यवरांच्या हस्ते आरती संपन्न

 

प्रतिनिधी : जुबेर शेख 

तुळजापूर:तुळजापूर तालुक्यातील मौजे दहिटणा येथे हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेसमोर मान्यवरांच्या हस्ते भावपूर्ण आरती संपन्न झाली. भक्तिमय वातावरणात पार पडलेल्या या कार्यक्रमामुळे संपूर्ण परिसर शिवमय झाला होता.


या प्रसंगी तुळजापूर तालुकाप्रमुख अमोल जाधव,तुळजापूर उपतालुकाप्रमुख अनिल भोपळे,वीर महाराष्ट्र न्यूज चॅनेल तसेच नेक्स्ट फ्रेम पेपरचे संपादक जुबेर शेख, शिवसैनिक बाळू भैय्या कदम व अमोल घोडके यांच्या शुभहस्ते आरती करण्यात आली. उपस्थितांनी “छत्रपती शिवाजी महाराज की जय”च्या घोषणांनी परिसर दणाणून सोडला.


कार्यक्रमासाठी दहिटणा येथील छत्रपती शिवाजी महाराज मंडळाचे अध्यक्ष वैजनाथ भोकरे, उपाध्यक्ष सुनील भोंडवे, सचिव बालाजी इंगोले, शंतनू कदम, मच्छिंद्र माने, संतोष भोंडवे, बलभीम कदम तसेच ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. मंडळाच्या वतीने कार्यक्रमाचे सुयोग्य नियोजन करण्यात आले होते.


आरतीनंतर मंडळाच्या वतीने सर्व मान्यवरांचा शाल, श्रीफळ व पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला. यावेळी मान्यवरांनी बोलताना छत्रपती शिवाजी महाराज यांच्या विचारांवर चालण्याचे आणि युवकांनी संघटित राहून समाजहितासाठी कार्य करण्याचे आवाहन केले.


मान्यवरांनी आरती करण्याची संधी दिल्याबद्दल मंडळाचे व ग्रामस्थांचे आभार मानले. कार्यक्रम शांततेत आणि उत्साहात पार पडला असून दहिटणा गावात एकात्मतेचा आणि शिवभक्तीचा सुंदर संदेश देणारा हा सोहळा ठरला.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या