Ticker

6/recent/ticker-posts

पालकमंत्री प्रतापराव सरनाईक यांचा 3 ते 5 फेब्रुवारी धाराशिव दौरा; जिल्हा परिषद निवडणुकीसाठी प्रचार सभांचा धडाका

 

प्रतिनिधी : जुबेर शेख 

धाराशिव :राज्याचे परिवहन मंत्री तसेच धाराशिव जिल्ह्याचे पालकमंत्री मा. ना. प्रतापराव सरनाईक हे येत्या 3 ते 5 फेब्रुवारी दरम्यान धाराशिव जिल्ह्याच्या दौऱ्यावर येत असून जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर त्यांचा हा दौरा अत्यंत महत्त्वाचा मानला जात आहे. या दौऱ्यात पालकमंत्री सरनाईक हे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या प्रचार सभांसह विविध ठिकाणी जिल्हा परिषद मतदारसंघांमध्ये जोरदार प्रचार सभा घेणार आहेत.

पालकमंत्री सरनाईक यांच्या दौऱ्यासाठी शिवसेना व महायुतीच्या वतीने जय्यत तयारी करण्यात आली असून कार्यकर्त्यांमध्ये मोठा उत्साह पाहायला मिळत आहे.

3 फेब्रुवारी रोजी पालकमंत्री प्रतापराव सरनाईक दुपारी 4.15 वाजता लोहारा तालुक्यातील जेवळी येथे पोहोचून उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या प्रस्तावित प्रचार सभेच्या स्थळाची पाहणी करणार आहेत. त्यानंतर सायंकाळी 7.30 वाजता ढोकी येथे तसेच रात्री 8.15 वाजता पळसप येथे जिल्हा परिषद उमेदवार अजित लाकाळ यांच्या प्रचारार्थ जाहीर सभा घेणार आहेत.

4 फेब्रुवारी रोजी दुपारी 12 वाजता उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या प्रचार सभेला पालकमंत्री सरनाईक उपस्थित राहणार आहेत. त्यानंतर सायंकाळी 6 वाजता मोहा येथे तर 7.30 वाजता मस्सा येथे प्रचार सभा घेऊन मतदारांशी थेट संवाद साधणार आहेत.

5 फेब्रुवारी रोजी सकाळी 10.30 वाजता सोलापूरहून तुळजापूर येथे आगमन होणार असून त्यानंतर विविध राजकीय व संघटनात्मक बैठका घेण्यात येणार आहेत.

या दौऱ्यामुळे धाराशिव जिल्ह्यातील जिल्हा परिषद निवडणुकीच्या प्रचाराला अधिक गती मिळणार असून महायुतीच्या उमेदवारांना मोठे बळ मिळेल, असा विश्वास पक्षाच्या पदाधिकाऱ्यांनी व्यक्त केला आहे. पालकमंत्री सरनाईक यांच्या दौऱ्याकडे संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागले आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या