प्रतिनिधी : जुबेर शेख
तुळजापूर : तुळजापूर पंचायत समितीमध्ये कार्यरत गट विकास अधिकारी अमोल ताकभाते व कृषी अधिकारी अशोक काळे यांची अन्यत्र बदली झाल्याने त्यांचा निरोप समारंभ आणि त्याचबरोबर नव्याने सहाय्यक गटविकास अधिकारी म्हणून नियुक्त झालेल्या सीमा गवळी यांचा सत्कार महाविकास आघाडी तुळजापूर यांच्या वतीने करण्यात आला.
या कार्यक्रमास कॉंग्रेस पक्षाचे जिल्हाध्यक्ष धीरज भैया पाटील, जनसेवक अमोल कुतवळ, श्याम मामा पवार, सुदर्शन वाघमारे, हरीश जाधव, संजय देशमुख, संजय कदम, राजाभाऊ जाधव यांच्यासह अनेक कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
कार्यक्रमात बोलताना वक्त्यांनी अमोल ताकभाते व अशोक काळे यांचे कार्यकाल अत्यंत प्रशंसनीय आणि विकासाभिमुख असल्याचे सांगितले. ग्रामीण भागातील योजनांची प्रभावी अंमलबजावणी, ग्रामविकासाच्या दृष्टीने घेतलेले उपक्रम, तसेच शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवलेली कृषीविषयक माहिती यामुळे त्यांचा कार्यकाळ उल्लेखनीय ठरल्याचे उपस्थितांनी नमूद केले.
नवीन सहाय्यक गटविकास अधिकारी सीमा गवळी यांचे यथोचित स्वागत करत त्यांना पुढील कार्यासाठी शुभेच्छा देण्यात आल्या. तालुक्यातील विकासकामे अधिक गतिमान व्हावीत, ही अपेक्षा यावेळी सर्वांनी व्यक्त केली.
कार्यक्रमाचे आयोजन अत्यंत मनोभावे पार पडले असून यामध्ये सहभागी झालेल्या सर्व कार्यकर्त्यांनी एकत्र येऊन समारंभाची शोभा वाढवली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभारप्रदर्शन जनसेवक अमोल कुतवळ यांनी केले.
0 टिप्पण्या