प्रतिनिधी : जुबेर शेख
तुळजापूर :"मी वडार महाराष्ट्राचा" या सामाजिक संघटनेच्या तुळजापूर तालुकाध्यक्षपदी श्री बालाजी चौगुले यांची नुकतीच नियुक्ती करण्यात आली आहे. या निमित्ताने जनसेवक अमोल कुतवळ व सर्व ओडिया राज समाज तुळजापूर यांच्यावतीने त्यांचा विशेष सत्कार करण्यात आला.
कार्यक्रमामध्ये यावर्षी दहावी व बारावी परीक्षेमध्ये यशस्वी झालेल्या विद्यार्थ्यांचाही गौरव करण्यात आला. विद्यार्थ्यांना सन्मानचिन्ह व प्रमाणपत्र देऊन त्यांचा उत्साहवर्धन करण्यात आले.
या प्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून सोमनाथ पवार, अनिल पवार, अविनाश मुद्गुले, पप्पू पवार, नागेश माने, कृष्णा पवार, ज्ञानेश्वर देवकर, महेश पवार, झोंटी पवार, आप्पा माने यांच्यासह अनेक ओडिया राज समाज संघटनेचे कार्यकर्ते उपस्थित होते.
नवीन तालुकाध्यक्षपदी नियुक्त झालेले श्री बालाजी चौगुले यांनी आपल्या मनोगतातून संघटनेच्या सामाजिक कार्यांची माहिती दिली आणि भविष्यात वडार समाजाच्या सर्वांगीण प्रगतीसाठी कटिबद्ध राहण्याचे आश्वासन दिले.
या कार्यक्रमामुळे एकात्मता, विद्यार्थ्यांचा सन्मान आणि नव्या नेतृत्वाला प्रोत्साहन मिळाल्याचे वातावरण उपस्थितांमध्ये जाणवले.
0 टिप्पण्या