Ticker

6/recent/ticker-posts

धाराशिव जिल्ह्याच्या पालकमंत्री पदी परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांचे नाव जाहीर






प्रतिनिधी : जुबेर शेख

धाराशिव: महाराष्ट्र राज्याचे मंत्र्यांना आता पालकमंत्र्याची जबाबदारी दिलेली पाहायला मिळत आहे. त्यामध्ये मंत्री धनंजय मुंडे यांच्या पालकमंत्री च्या यादीमध्ये नाव समाविष्ट नसल्याने मंत्री धनंजय मुंडे यांना मोठा धक्का मानला जात आहे. 

पारंपरिक धाराशिव जिल्हा हा शिवसेनेचा बालेकिल्ला मानला जात आहे. त्यामुळे मागील सरकारमध्ये आमदार तानाजी सावंत यांच्याकडे धाराशिव जिल्ह्याचे पालकमंत्री पद होते. पण फडवणीस सरकारमध्ये धाराशिव जिल्ह्याला एकही मंत्रिपद न मिळाल्याने धाराशिव जिल्ह्याचे पालकमंत्री कोण होणार याकडे संपूर्ण धाराशिवरांचे लक्ष लागले होते. 
मध्ये मध्ये धनंजय मुंडे यांच्याकडे धाराशिव जिल्ह्याचे पालकमंत्री येईल अशी शक्यता वाटत असताना धाराशिव जिल्ह्यातील सकल मराठा समाजाने मंत्री धनंजय मुंडे यांना धाराशिव जिल्ह्याचे पालकमंत्री देण्यासाठी विरोध केला होता. 

त्यातच आत्ताच प्रसिद्ध झालेल्या यादीमध्ये धाराशिव जिल्ह्याचे पालकमंत्री पद परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांच्याकडे देण्यात आले आहे. पुन्हा एकदा धाराशिव जिल्ह्यात शिवसेनेचा पालकमंत्री देण्यात आल्या असल्यामुळे येणाऱ्या काळात अजून मोठ्या प्रमाणात शिवसेना पक्षाला बळकटी मिळणार असल्याचे सांगण्यात येत आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या