प्रतिनिधी : अशोक गरड
औसा :कमलाई बहुउद्देशीय सेवाभावी संस्थेच्या वतीने औसा तालुक्यात अनाथ,निराधार,निराश्रित,मागास प्रवर्गातील मुलांना गणवेश वाटप करण्यात आले आहे.कमलाई बहुउद्देशीय सेवाभावी संस्था ही विविध क्षेत्रात विविध उपक्रम अत्यंत चांगल्या प्रकारे राबवित असून समाजाप्रती एक बांधिलकी जपत अनाथ,निराधार बालकांचा सर्वांगीण विकासासाठी गणवेश वाटप करण्यात आले आहे.
कार्यक्रमासाठी संस्थेचे सचिव श्री.प्रमोद सुरवसे,सौ.कमल सुरवसे श्री.सतिश गायकवाड,सौ.वनिता शिंदे तसेच कार्यक्रम अध्यक्षस्थानी सौ.सुरेखा गायकवाड मॅडम,प्रमुख पाहुणे अरुणकुमार गवळे सर,मारुती कांबळे सर,जनार्दन कांबळे सर,माधव गायकवाड सर,राजकुमार कांबळे सर,साळुंके सर,तेलंगे सर,विमल कांबळे ताई,अनुसया कांबळे ताई,आणि सागर गायकवाड अदी उपस्थित होते.
0 टिप्पण्या