प्रतिनिधी: सुनील पवार
अकोला: मूर्तिजापुर तालुका येथील मौजे जामठी येथील जवाहर विद्यालय मूर्तिजापूर याचा यंदाचा दहावीचा निकाल ९२ टक्के लागला आहे यामध्ये शाळेमधून एकूण ७२ विद्यार्थी दहावीच्या परीक्षेत बसले होते त्यापैकी ६७ विद्यार्थी पास झाले आहे.
संपूर्ण राज्यामध्ये यंदाही मुलीनेच बाजी मारलेली प्रत्येक जिल्ह्यामध्ये पाहायला मिळत आहे.त्यातच जामठी येथील विद्यालय मध्ये प्रथम क्रमांक हा आंचल सुनील राऊत या विद्यार्थिनी ९२.६० % मार्क घेऊन शाळेत प्रथम क्रमांक पटकावला आहे.यासाठी संपूर्ण गावातून व शाळेतील शिक्षक यांच्या वतीने यांच्यावतीने विद्यार्थिनीवर कौतुकाचे वर्षाव करण्यात येत आहे.
दरवर्षीप्रमाणे याही वर्षी जवाहर विद्यालयाने आपली उत्तीर्णची परंपरा कायम राखली आहे. त्यामुळे गावाच्या वतीने त्या ठिकाणी शिकवणाऱ्या शिक्षकांचा अभिनंदनाने वर्षाव करण्यात येत आहे.
0 टिप्पण्या