प्रतिनिधी : जुबेर शेख
तुळजापूर : काँग्रेसचे माजी मंत्री मधुकर चव्हाण यांचे पुत्र आणि श्री तुळजाभवानी कारखान्याचे अध्यक्ष सुनील चव्हाण आज भाजपमध्ये प्रवेश करणार आहेत.भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्या उपस्थितीत धाराशिवमध्ये हा भाजप प्रवेश सोहळा होणार आहे.माजी मंत्री बसवराज पाटील यांच्या पाठोपाठ चव्हाण कुटुंबातील सदस्य भाजपवासी होणार असल्याने धाराशिव जिल्ह्यात काँग्रेसची अवस्था अत्यंत बिकट झाली आहे.
लोकसभेच्या धाराशिव मतदारसंघातील सहा पैकी पाच आमदार महायुतीचे आहेत.त्यात काँग्रेसचे माजी मंत्री बसवराज पाटील,काँग्रेसचे माजी मंत्री मधुकर चव्हाण यांचे पुत्र सुनील चव्हाण भाजपमध्ये प्रवेश केल्याने महविकास आघाडीचे उमेदवार ओमराजे निंबाळकर एकटे पडले असून,महायुतीच्या उमेदवार अर्चनाताई पाटील यांचे पारडे अधिक मजबूत झाले आहे.
आज सुनील चव्हाण यांच्या सोबत जिल्ह्यातील काँग्रेसचे अजून कोण कोणते नेते व कार्यकर्ते प्रवेश करणार याकडे संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागले आहे.उस्मानाबाद लोकसभा मतदारसंघात यामुळे 'हाय होल्टेज' लढत असून,अटीतटीचा सामना होत आहे.
0 टिप्पण्या