प्रतिनिधी : जुबेर शेख
धाराशिव:उस्मानाबाद लोकसभा निवडणुकीच्या अर्ज भरण्यासाठी आजपासून सुरुवात झाली आहे. पहिल्याच दिवशी १८ उमेदवारांनी एकूण ३६ अर्ज घेतले आहेत.त्यामध्ये प्रामुख्याने राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे मराठवाडा शिक्षक पदवीधर मतदार संघाचे विद्यमान आमदार विक्रम काळे यांनी निवडणूक लढवण्यासाठी चार अर्ज घेतले आहेत.त्यामुळे येणाऱ्या काळात राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये बंड करून विक्रम काळे आपला निवडणूक अर्ज भरणार का याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
तसेच इतर उमेदवारांमध्ये अर्जुन सलगर,मारुती बनसोडे,दत्ता तुपे,समीरसिंह साळवे,इस्माईल पठाण,प्रवीण कांबळे,आर्यनराजे शिंदे,नवनाथ दुधाळ,रहीमोद्दीन काझी,गोपाळ दंडगुले,सिराजोद्दीन सय्यद,जावेद पटेल,नवनाथ उपळेकर,विश्वजीत शिंदे,विलास घाडगे,काकासाहेब राठोड,गोपाळ जगताप यांचा समावेश आहे.
0 टिप्पण्या