प्रतिनिधी : जुबेर शेख
तुळजापूर: तुळजापूर येथील लिट्ल फ्लॉवर्स मराठी प्राथमिक शाळा,तुळजापूर येथे (दि.१८) रोजी स्वयंशासन दिनानिमित्त शाळेतील इयत्ता सातवीचा विद्यार्थी मयुरेश कदम याची मुख्याध्यापक म्हणून तर मुख्याध्यापिका म्हणून वैभवी राऊत हीची नेमणूक करण्यात आली.इयत्ता सातवीच्या विद्यार्थ्यांनी इयत्ता पहिली ते पाचवीच्या विद्यार्थ्यांना अध्यापन करण्याचे काम केले.
यानंतर सातवीच्या विद्यार्थ्यांना सहावीच्या विद्यार्थ्यांकडून निरोप देण्यासाठी निरोप समारंभाचे आयोजन करण्यात आले होते.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी शाळेचे मुख्याध्यापक संजय पवार व तसेच प्रमुख पाहुणे म्हणून मयुरेश कदम व वैभवी राऊत यांची नेमणूक करण्यात आली.कार्यक्रमाला शालेय व्यवस्थापन समितीच्या सदस्या वंदना गजाकोश व सर्व शिक्षक उपस्थित होते.
यावेळी मुख्याध्यापक संजय पवार,शिवाजी कारंडे,अनिता कदम,सुनिता शिंदे,लिटिल फ्लावर्स मराठी माध्यमिक शाळेचे सहशिक्षक राठोड सर यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले.कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी सांस्कृतिक विभाग प्रमुख लक्ष्मण चौधरी व वनिता कारंडे यांनी परिश्रम घेतले.
0 टिप्पण्या