Ticker

6/recent/ticker-posts

काक्रंबा येथे भारतीय संविधान दिन उत्साहात साजरा


 प्रतिनिधी : अहमद अन्सारी

 तुळजापूर : तालुक्यातील काक्रंबा येथे (दि२६) आज रोजी भारतीय संविधान दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. प्रथमता गावातील सामाजिक व राजकीय मान्यवरांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन करण्यात आले. 

संविधान दिनानिमित्त पंचशील तरुण मंडळातर्फे जिल्हा परिषद केंद्रीय प्राथमिक शाळा येथील विद्यार्थ्यांना खाऊ वाटप करून संविधान दिन साजरा करण्यात आला.

यावेळी काक्रंबा गावचे सरपंच कालिदास खताळ, तंटामुक्ती अध्यक्ष दत्तात्रय बंडगर,विनोद साबळे, प्रगणेश डावरे, कपिल मस्के, चेतन बंडगर,सद्दाम मुलानी,अशिम अन्सारी,बबन शेख, विकास भिसे, विकास चंदनशिवे, सुधीर मस्के, अनिल काका बंडगर, बालाजी वाघमारे, बाळू चंदनशिवे, किशोर सोनवणे आदीसह भीम सैनिक व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या