प्रतिनिधी : जुबेर शेख
सोलापूर : सोलापूर येथे (दि.१६) रोजी जनशक्ती शेतकरी संघटनेच्या सोलापूर शहराध्यक्षपदी सिकंदर नदाफ यांची निवड शेतकरी संघटनेचे संस्थापक अध्यक्ष अतुल ( भाऊ ) खूपसे पाटील यांच्या शुभहस्ते नियुक्तीपत्र देऊन निवड करण्यात आली.त्यानंतर पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला व पुढील वाटचालीस शुभेच्छा देण्यात आले.
सिकंदर नदाफ हे देवा ग्रुप फाउंडेशन भारत सोलापूर जिल्हाध्यक्ष या पदावर कार्यरत होते.त्यांनी लोकसभा व विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर जनशक्ती संघटनेमध्ये प्रवेश केल्यामुळे संपूर्ण जिल्ह्यामध्ये चर्चेला उधाण आले आहे.
जनशक्ती संघटना सोलापूर शहरामध्ये मजबूत करण्याचे काम येणाऱ्या काळामध्ये करणार आहे असे नूतन शहराध्यक्ष सिकंदर नदाफ यांनी माध्यमाला सांगितले.
येणाऱ्या लोकसभा व विधानसभा मध्ये जनशक्ती संघटना निवडणूक मध्ये उतरणार का याकडे सर्व राजकीय नेत्यांचे लक्ष लागले आहेत.
या नियुक्ती सोहळ्याच्या कार्यक्रमास वीर महाराष्ट्र न्यूज चॅनेलचे मुख्य संपादक जुबेर शेख,जनशक्ती संघटनेचे तुळजापूर तालुकाध्यक्ष अहमद अन्सारी,पत्रकार सिद्दीक पटेल,राम थोरात,सोनू सय्यद,सद्दाम नदाफ,बिलाल पटेल,हजरत बिलाल शेख, शिवाजी नागोरे,सादीक नदाफ तसेच कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
0 टिप्पण्या