प्रतिनिधी:राम थोरात
तुळजापूर: तुळजापूर येथे (दि.२२) रोजी तुळजापूर उपजिल्हा रुग्णालय मध्ये आझाद बहुउद्देशीय सामाजिक संस्थेच्या वतीने छत्रपती शिवाजी महाराज जयंती निमित्त रुग्णांना फळ वाटप करून जयंती साजरी करण्यात आली.
आझाद बहुउद्देशीय सेवाभावी संस्था नेहमी विविध सामाजिक उपक्रम घेण्यासाठी अग्रेसर असते आपल्या भारतामध्ये विविध महापुरुषाच्या जयंती साजरी होतात त्या जयंती वेळेस विविध सामाजिक उपयोगी कार्यक्रम आझाद बहुउद्देशीय सामाजिक संस्थेच्या वतीने घेण्यात येत असते.
त्याचप्रमाणे उभ्या हिंदुस्थानाचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंती निमित्त उपजिल्हा रुग्णालय येथील रुग्णांना दरवर्षीप्रमाणे याही वर्षी फळ वाटप करून छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती मोठ्या उत्साहामध्ये साजरी करण्यात आली.
आझाद बहुउद्देशीय सेवाभावी संस्थेच्या वतीने घेण्यात आलेल्या या उपक्रमाचा सर्व शहरवासीयांच्या वतीने कौतुक करण्यात येत आहे व यापुढेही असे उपक्रम राबवण्यासाठी त्यांना शुभेच्छा पण देण्यात येत आहेत.
तुळजापूर येथील उपजिल्हा रुग्णालय येथे फळ वाटप कार्यक्रमासाठी रुग्ण कल्याण समितीचे सदस्य आनंद कंदले, सिव्हिल सर्जन डॉ. संतोष पाटील, डॉ.क्षीरसागर, डॉ.विनोद बर्वे, डॉ.श्रीधर जाधव, डॉ.अंजली गाटे,डॉ. हिराले, डॉ.अकील राठोड,युसूफ शेख,वाहेद शेख,दिलीप (मामा) सोनवणे,राजेश्वर (गुड्डू) कदम,नितेश अभंगराव,अशपाक शेख,आरिफ बागवान,मुबारक शेख,आझाद बहुउद्देशीय सामाजिक संस्थेचे अध्यक्ष मोहसीन बागवान,कुणाल जाधव,मतीन बागवान,अशपाक सय्यद,सुरज चौधरी,प्रतीक कांबळे,सलमान तांबोळी,मयूर गुरव,पंकज साबळे,सद्दाम तांबोळी,सलमान बागवान,कैफ बागवान,वाहिद पटवेकर,रिझवान पटवेकर,आयान पठाण,फझल बागवान,झियान बागवान,जफर शेख, वाहेद शेख तसेच आझाद बहुउद्देशीय सेवाभावी संस्थेचे सर्व सभासद मोठ्या संख्येने उपस्थित होते.
0 टिप्पण्या