Ticker

6/recent/ticker-posts

समाजामध्ये तेढ निर्माण करणाऱ्या राजा ठाकूर यांच्यावर कठोर कारवाई करा:एमआयएमची मागणी


प्रतिनिधी: मुदस्सर शेख 

लातुर: लातूर येथे (दि.१९) छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त छत्रपती शिवाजी महाराज चौकात छत्रपती शिवाजी महाराजांना मानवंदना देण्यासाठी राजा ठाकूर यांना बोलवण्यात आले होते मानवंदना दिल्यानंतर राजा ठाकूर यांनी भडकाऊ भाषण करून जातीय तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न केला या संपूर्ण भाषणाचा व्हिडिओ प्रसारमाध्यमाच्या मार्फत प्रसारित झाल्यानंतर राजा ठाकूर यांच्यावर लातूर शहरातील विविध संघटनेने समाजामध्ये तेढ निर्माण करणारी भाषण केल्याबद्दल राजा ठाकूर व आयोजकावर कडक कारवाई करण्यात यावी यासाठी पोलीस निरीक्षक मार्फत मुख्यमंत्री यांना निवेदन देण्यात आले आहे.

निवेदनात सांगण्यात आले आहे की राजा ठाकूर यांना सार्वजनिक ठिकाणी भाषण करण्यास मनाई असताना सुद्धा त्यांना लातूर शहरांमध्ये येण्याची परवानगी कशी काय देण्यात आली. त्यांच्या भाषणामुळे संपूर्ण लातूर शहरांमध्ये अशांतता पसरलेली आहे. हिंदू मुस्लिम मध्ये तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न राजा ठाकूर यांनी भाषणामध्ये केलेला आहे. तरी लवकरात लवकर राजा ठाकूर व आयोजकावर कडक कारवाई करण्यात यावी अन्यथा विविध संघटनेच्या मार्फत त त्रीव व प्रकारे आंदोलन करण्यात येईल असा इशारा देण्यात आला आहे.

यावेळी एमआयएम लातूर जिल्हा अध्यक्ष ॲड.मुहम्मदअली शेख़,लातुर शहर अध्यक्ष मुज़ीब हमदुले,शहर कार्यकारी अध्यक्ष जावेद पटेल,शहर उपाध्यक्ष शेख़ सत्तार,शहर उपकार्यकारी अध्यक्ष सय्यद ईनाम,शेख ताहेर,शेख जावेद,यासिनख़ान पठान,अहमदख़ान पठान, तौहीद मुजावर,सादिक़ मौलाना व अन्य उपस्थित होते.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या