Ticker

6/recent/ticker-posts

शिंदे - फडवणीस सरकारचा दुसरा मंत्रिमंडळ विस्तार ठरला !


पुणे जिल्हा प्रतिनिधी : प्रविन मोरे

मुंबई: शिवसेनेतील बंडानंतर राज्यात सत्तातंर झाले मात्र महिनाभर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस या दोघांनी मंत्रीमंडळ नसतांना सरकार चालवले यावरून मोठी टीकेला सामोरे जावे लागले रखडलेला मंत्रीमंडळाचा शपथविधी पार पडला मात्र दुसरी फेरी कधी होणार याच्या प्रतिक्षेत आमदार बसले आहेत आता खुद्द देवेंद्र फडणवीस यांनी दिवाळीनंतर मंत्रिमंडळाचा विस्तार होईल, अशी प्रतिक्रिया दिली आहे. कोरोनामुळे सलग दोन वर्षे नागपुरात हिवाळी अधिवेशन झाले नाही. 

यंदा डिसेंबरमध्ये नागपूरमध्ये दोन आठवड्यांचे अधिवेशन पार पडणार आहे. या अधिवेशनापूर्वीच राज्य मंत्रिमंडळाचा विस्तार होणार असल्याची माहिती उपमुख्यमंत्र्यांनी दिली आहे. तसेच मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी देखिल मंत्रिमंडळ विस्ताराचा फॉर्म्युला ठरला असल्याचे म्हटले आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या