Ticker

6/recent/ticker-posts

अपक्ष आमदार बच्चू कडू एकनाथ शिंदे यांची साथ सोडणार ?


पुणे जिल्हा प्रतिनिधी : प्रवीण मोरे

अमरावती : अमरावती येथे अपक्ष आमदार बच्चू कडू यांनी पत्रकार परिषदेत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या खास मर्जीतील अपक्ष आमदार रवी राणा यांनी बच्चू कडूंचे नाव घेत गुवाहाटीला गेलेल्या आमदारांनी पैसे घेतल्याचा आरोप केला होता यावरून राजकारण चांगलेच तापलेले असून बच्चू कडू यांनी शिंदे - भाजप सरकारलाच आव्हान दिले आहे. 

राणांच्या आरोपाबाबत भूमिका स्पष्ट करावी, अन्यथा मला वेगळी भूमिका घ्यावी लागेल, असा धमकीवजा इशारा दिला आहे. आतापर्यंत या प्रकरणात एकनाथ शिंदे किंवा देवेंद्र फडणवीस यांनी मध्यस्थी केलेली नाही. 

त्यातच बच्चू कडूंनी तत्कालीन मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांच्या निवासस्थानासमोर राणा दाम्पत्याने हनुमान चालिसा पठण करण्याचा निर्णय अतिशय चुकीचा होता, असे बच्चू कडू यांनी जाहीरपणे म्हटल्यावर राजकिय वर्तुळात चर्चांना उधाण सुटले आहे.

पुढील काळामध्ये मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडवणीस बच्चू कडू व रवी राणा यांचा वाद मिटवणार ? पुढील काळात बच्चू कडू कोणती भूमिका घेणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

पुढील काळामध्ये जर बच्चू कडू यांनी एकनाथ शिंदे यांची साथ सोडली तर एकनाथ शिंदे यांची मोठ्या प्रमाणात कोंडी होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या