पुणे जिल्हा प्रतिनिधी : प्रविन मोरे
मुबंई : रस्त्या अपघातामध्ये कायमचे अपंगत्व आल्यानंतर माणसाचे आयुष्य उध्वस्त होऊन जाते.
मुंबई हायकोर्टाने हीच बाब लक्षात घेत, एका प्रकरणांमध्ये कायमचे अपंगत्व आलेल्या व्यक्तीस एक कोटी रुपये नुकसान भरपाई देण्याचे निर्देश दिले आहेत. धातू कापणीचं काम करणारे याचिकाकर्ते योगेश पांचाळ हे २९ नोव्हेंबर २००४ रोजी दुचाकीवरून मुलुंडमधील सोनापूर बस स्थानकाजवळून जात असताना मागून येणाऱ्या एका डंपरनं त्यांना धडक दिली होती.
या घटनेनंतर त्यांना कायमचे अपंगत्व आले. याचीच नुकसान भरपाई मागण्यासाठी त्यांनी न्यायालयात दाद मागितली होती. या प्रकरणाचा निकाल देत न्यायालयाने त्यांचे बाजू जाणून घेऊन, दिलासादायक असा निकाल दिला आहे.
0 टिप्पण्या