पुणे जिल्हा प्रतिनिधी : प्रविन मोरे
पुणे : पुणे येथील भारती विद्यापीठ पोलीस स्टेशन मध्ये आमदार रवी राणा यांच्या विरोधात प्रहार जनशक्ती पक्षाचे पुणे युवा कार्याध्यक्ष संतोष साठे यांनी तक्रार दाखल केली आहे. यामध्ये प्रहार जनशक्ती पक्षाचे संस्थापक अध्यक्ष माननीय आमदार ओमप्रकाश उर्फ बच्चुभाऊ कडू यांच्या विरोधात खोटे आरोप करणे चालू आहे. तरी रवी राणा यांच्याकडून सोशल मीडिया द्वारे बच्चू कडू यांची बदनामी करण्यात येत आहे.
तसेच आ. रवी राणा यांनी माध्यमाशी बोलताना असे सांगितले की " बच्चू कडू चे काही आंदोलन करतात ते फक्त तडजोडी साठी करतात. बच्चू कडू हा सोंगाड्या आहे. त्याला कुठल्याही प्रकारची मानमर्यादा नाही. " अशा वेगवेगळ्या प्रकारचे आ. रवी राणा कडून आ. बच्चू कडू त्यांच्यावर आरोप करण्यात आले आहे. त्या विरोधात आज प्रहार जनशक्ती पक्ष पुणे कार्याध्यक्ष संतोष साठे यांच्या वतीने पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दाखल करण्यात आली आहे.
यावेळी युवा जिल्हा संघटक पंकज नवनाथ अवघडे ,युवा शहराध्यक्ष प्रेम राज पवार हे उपस्थित होते.
आ. रवी राणा यांच्या विरोधात जर लवकरात लवकर गुन्हा नाही दाखल झाल्यास प्रहार जनशक्ती पक्षाच्या वतिने तीव्र प्रकारचे आंदोलन करण्यात येईल असे संतोष साठे यांच्या वतीने सांगण्यात आले आहे.
आता पुढील काळामध्ये आमदार रवी राणा यांच्या विरोधात गुन्हा दाखल होतो का नाही ते पहावे लागणार आहे.
0 टिप्पण्या