उस्मानाबाद जिल्हा प्रतिनिधी : रुपेश डोलारे
कळंब : कळंब येथे उप विभागीय पोलीस अधिकारी कार्यालय, कळंब यांचे पथक कळंब उप विभागातील अवैध धंद्यांविषयी माहिती काढून कायदेशीर कारवाई करण्यासाठी दि. २२-१०-२०२२ रोजी गस्तीस होते. दरम्यान पथकास गोपनीय माहिती मिळाली की, तेर येथील नामदेव जाधवर यांच्या दोन पत्रा शेडमध्ये जुगार चालू आहे. यावर पथकाने प्रथमत: पहिल्या शेडमध्ये संध्याकाळी ०५.३० वाजेच्यासुमारास छापा टाकला असता तेथे तेर येथील- १. संतोष शिवाजी खटिंग व बुकनवाडी येथील- २. अमोल जॉन एडके हे दोघे कल्याण मटका जुगार चालवण्याच्या साहित्यासह रक्कम असा एकुण २१,७४० ₹ चा माल बाळगलेले आढळले. तर दुसऱ्या छाप्यात जवळच असलेल्या दुसऱ्या शेडमध्ये संध्याकाळी ०५.३५ वाजेच्यासुमारास छापा टाकला असता तेथे तेर येथील- १.सुजित नानासाहेब देवकते २.आकश गुलाब देशमुख ३.सोमनाथ बळीराम दुधाळ ४.बिरु अर्जुन कोकरे ५.विजय बळीराम दुधाळ ६.सुनिल शामराव सराफ व सोलापूर येथील- ७.सुकेश रतन माने हे सर्व लोक ऑनलाईन चक्री जुगार चालवण्याच्या साहित्यासह संगणक संच व रोख रक्कम असा एकुण ७८,१८०₹ चा माल बाळगलेले आढळले.
यावर पथकाने नमूद दोन्ही ठिकाणच्या जुगार चालवण्याच्या साहित्यासह संगणक संच व रोख रक्कम असा एकुण ९९,९२० ₹ चा माल जप्त करुन नमूद व्यक्तींविरुध्द महाराष्ट्र जुगार प्रतिबंधक कायदा कलम- ४,५ अंतर्गत ढोकी पो.ठा. येथे स्वतंत्र २ गुन्हे नोंदवले आहेत.
सदरची कामगिरी मा.पोलीस अधीक्षक श्री.अतुल कुलकर्णी, मा.अपर पोलीस अधीक्षक श्री.नवनीत काँवत यांच्या आदेशावरुन कळंब उप विभागाचे ए.एस.पी.- श्री. एम. रमेश यांच्या मार्गदर्शनाखाली पोउपनि- श्री. पुजरवाड, पोलीस अंमलदार- शेख, खांडेकर, मंदे, भांगे यांच्या पथकाने केली आहे.
0 टिप्पण्या