Ticker

6/recent/ticker-posts

राज्यातील या दोन आमदारांत संघर्ष टोकाला ; थेट पोलिस ठाण्यात तक्रार


महाराष्ट्र राज्य प्रतिनिधी : जावेद शेख

अमरावती : अमरावती जिल्ह्यातील अचलपूर येथील अपक्ष आमदार बच्चू कडू यांनी अमरावतीचे अपक्ष आमदार रवी राणा यांच्याविरोधात पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. रवी राणांविरोधात आमदार बच्चू कडू यांची अमरावतीमधील राजापेठ पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. 

रवी राणा यांनी बच्चू कडू यांच्यावर गंभीर आरोप केले होते. बच्चू कडू यांनी गुवाहाटीला जाऊन कोट्यवधी रुपये लाटल्याचा गंभीर आरोप रवी राणा यांनी केला होता. या आरोपानंतर बच्चू कडू आक्रमक झाले आहेत.

रवी राणा यांनी माझी बदनामी केली आहे . २०-२० वर्ष आमची राजकीय करिअर उभं करायला गेली. मी पैसे घेऊन जर गुवाहाटीला गेलो असेल तर पैसे देवेंद्र फडणवीस किंवा एकनाथ शिंदेजी यांनी यांनी यांचं उत्तर दिलं पाहिजे असं बच्चू कडू यांनी म्हटलं आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या