इंटरनेट एक्सप्लोरर अखेर 15 जून रोजी बंद होणार आहे . मायक्रोसॉफ्टने 27 वर्षांनंतर इंटरनेट एक्सप्लोरर बंद करण्याचा निर्णय घेतला आहे . 90 च्या दशकातील वापरकर्ते नॉस्टॅल्जिक होत आहेत कारण इंटरनेटवरील आपल्या अनेक जुन्या आठवणी त्याच्याशी निगडीत आहेत .
सुरवातीच्या काळात इंटरनेट एक्सप्लोरर हा एकमेव पर्याय उपलब्ध होता . 2003 मध्ये जवळपास 95 % वापरकर्त्यांसह ब्राउझरने सर्वोच्च शिखर गाठले होते परंतु इतर प्रतिस्पर्थ्यांकडून वापरकर्त्यांना गुगलक्रोम नवीन ब्राउझरचा पर्याय मिळाल्यामुळे नंतरच्या वर्षांमध्ये इंटरनेट एक्सप्लोररचा वापर कमी झाला आहे.
मायक्रोसॉफ्ट ने 17 ऑगस्ट 2021 रोजी इंटरनेट एक्स्प्लोररसाठी सपोर्ट बंद केला आणि 30 नोव्हेंबर 2020 रोजी मायक्रोसॉफ्ट टीम्सने IE साठी सपोर्ट बंद केला . रिपोर्ट्सनुसार , इंटरनेट एक्सप्लोरर 15 जून 2022 रोजी बंद होणार आहे .
0 टिप्पण्या