प्रतिनिधी:- अहमद अन्सारी
काक्रंबा:- तुळजापूर तालुक्यातील मौजे काक्रंबा येथे (दि.१) रोजी रामनवमीनिमित्त भव्य हाफ स्पीच क्रिकेट स्पर्धेचे आयोजन जगदंबा ग्रुपच्या वतीने करण्यात आले आहे .
या कार्यक्रमाचे उद्घाटन धाराशिव जिल्ह्याचे उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे युवा सेना सरचिटणीस लखन(भैया)परमेश्वर,युवा नेते अशोक देवगुंडे,श्याम ढेरे,राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते शहाजी नन्नवरे,मारुती देवगुंडे यांच्या हस्ते करण्यात आले.
या स्पर्धेमध्ये तुळजापूर तालुक्यातील २० ते २५ संघाने सहभाग नोंदवला आहे.
यावेळी उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे तुळजापूर सोशल मीडिया तालुकाप्रमुख चेतन भाऊ बंडगर,महादेव पवार,विनोद साबळे,विकास चंदनशिवे, सद्दाम मुलाणी,नागनाथ खताळ,तंटामुक्ती अध्यक्ष प्रशांत देवगुंडे,रोहित म्हेत्रे,समाधान देवगुंडे आदीसह जगदंबा ग्रुपचे सर्व सदस्य उपस्थित होते.
0 टिप्पण्या