Ticker

6/recent/ticker-posts

मोठी बातमी ! मुख्यमंत्री शिंदे भडकले ; बोलावली तातडीची बैठक


प्रतिनिधी : जावेद शेख

मुंबई : कृषीमंत्री अब्दुल सत्तार यांनी खासदार सुप्रिया सुळे यांच्याबद्दल केलेल्या आक्षेपार्ह वक्तव्यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे संतप्त झाले आहेत. अब्दुल सत्तार यांच्या विधानानंतर राष्ट्रवादी काँग्रेसने राज्यभर आंदोलन सुरु केले असून या आंदोलनाची गंभीर दखल मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी घेतली आहे. तसेच मुख्यमंत्री शिंदे यांनी तात्काळ अब्दुल सत्तार यांना फोन करून माफी मागण्यास सांगितले असल्याचे बोलले जात आहे. 

शिंदे गटाची प्रतिमा मलिन होत आहे. या संदर्भात शिंदे गटाचे प्रवक्ते दिपक केसरकर यांनी सर्व मंत्र्यांना शांत राहण्याचे आणि कोणतेही चुकीचे विधान करू नये असे आवाहन केले आहे. तसेच मुख्यमंत्र्यांच्या वर्षा निवासस्थानी महत्त्वाच्या नेत्यांची बैठक आयोजित करण्यात आल्याचे सांगितले जात आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या