प्रतिनिधी : अहमद आन्सारी
येरमाळा पोलीस ठाणे : मालेगाव, जि. नाशिक येथील- फकीरा ईस्माईल शेख, वय ५० वर्षे हे कुटूंबीयांसह दि. ०३-११-२०२२ रोजी मालेगाव ते हैद्राबाद असा मिनी ट्रॅव्हल्स क्र. एम.एच. १८ ए.ए ९१४१ ने प्रवास करत होते. प्रवासा दरम्यान ट्रॅव्हल्स ०१.०० वा. दरम्यान येरमाळा येथील भारत पेट्रोल पंपाजवळ आली असता ट्रॅव्हल्स वरील ५ बॅग त्यांत असलेल्या २८,००० ₹ रक्कम, एक मोबाईल फोन व कपड्यांसह असा एकुण ३९,३०० ₹ चा माल अज्ञात व्यक्तीने चोरुन नेला. अशा मजकुराच्या फकीरा शेख यांनी दि. ०३-११-२०२२ रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन येरमाळा पो.ठा. येथे गुन्हा क्र. २९५/२०२२ हा भा.दं.सं. कलम- ३७९ अंतर्गत नोंदवला आहे.
गुन्हा तपासादरम्यान मा. पोलीस अधीक्षक श्री. अतुल कुलकर्णी व मा. अपर पोलीस अधीक्षक श्री. नवनीत काँवत यांच्या मार्गदर्शनाखाली व कळंब उप विभागाचे सहायक पोलीस अधीक्षक यांच्या सुचनांप्रमाणे येरमाळा पो.ठा. चे प्रभारी सपोनि- श्री. दिनकर गोरे, सपोफौ- नितीन पाटील, पोहेकॉ- किरण औताडे, पोना- प्रकाश चाफेकर, धनंजय सांडसे, पोकॉ- मयुर बेले यांच्या पथकाने गुन्ह्याच्या कार्यपध्दीच्या व मिळालेल्या गोपनीय माहितीच्या आधारे लक्ष्मी पारधी पिढी, तेरखेडा येथील- दत्ता दादा काळे, वय २० वर्षे यास आज दि. ०६-११-२०२२ रोजी पारधी पिढीवरुन ताब्यात घेउन गुन्ह्यात चोरी गेलेल्या माला पैकी चार बॅग, २५,१५० रोख रक्कम व ओपो मोबाईल फोन असा एकुण ३६,१५० ₹ चा माल जप्त करुन गुन्हा उघडकीस आणला आहे. गुन्ह्यातील त्याच्या उर्वरीत साथीदारांचा पोलीस शोध घेत आहेत.
0 टिप्पण्या