प्रतिनिधी : प्रविन मोरे
मुंबईः शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांचा जामीन रद्द करण्याच्या याचिकेवर आज ( शुक्रवार ११ नोव्हेंबर ) उच्च न्यायालयात सुनावणी होणार आहे.
संजय राऊत यांचा जामीन रद्द व्हावा अशा आशयाची याचिका ईडीने उच्च न्यायालयात दाखल केली होती. त्यावर आज सुनावणी होणार आहे. पीएमएलए कोर्टाने तब्बल १०० दिवसांनी संजय राऊत यांना जामीन मंजूर केला. मात्र ईडीने कोर्टात जामीनाला स्थगिती देण्याची मागणी केली. तसेच या निकालाला हायकोर्टात आव्हान दिले. त्यामुळे आता ईडीच्या युक्तीवादावर हायकोर्ट काय निर्णय देणार हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.
काल अपुरावेळामुळे या निकालावर सुनावणी झाली नसल्यामुळे तो निकाल आज गेल्यावर सुप्रीम कोर्टाने सांगितले आहे आज सुप्रीम कोर्ट या याचिकेवर निकाल देणार ? व पुढील तारीख देणार हे पाहणे महत्त्वाचे ठरेल.
सर्व शिवसैनिक या निकालाकडे लक्ष लावून राहिले आहेत आज सुप्रीम कोर्ट काय निकाल देणार याकडे संपूर्ण देशाचे लक्ष लागले आहे.
0 टिप्पण्या