प्रतिनिधी : प्रविन मोरे
मुंबई: राज्यातील सत्तासंघर्ष, शिवसेनेतील फूट आणि आमदारांची अपात्रता आदी मुद्द्यांवर सर्वोच्च न्यायालयात सुनावणी सुरु आहे. मंगळवारी न्यायमूर्ती डॉ . धनंजय चंद्रचूड यांच्या अध्यक्षतेखालील घटनापीठापुढे सुनावणी सुरु झाली, त्यावेळी कोर्टाने सुरुवातीलाच दोन्ही गटांनी कागदपत्रांचा गोषवारा साजर करण्याचे निर्देश दिले.
तसेच दोन्ही बाजूंनी एकत्रितरित्या महत्त्वाचे मुद्दे ठरवून ते सांगण्यास सांगितले. त्यानुसार दोन्ही बाजूंच्या वकिलांनी विचार करुन ३ आठवड्यांची वेळ मागितली. त्यानंतर न्यायालयाने ४ आठवड्याचा म्हणजे जवळपास एक महिन्याचा वेळ दिला. याचा अर्थ राज्यातील सत्तासंघर्षावरील सुनावणी ही आता लांबणीवर पडली आहे.
आता पुढील सुनावणी ही २९ नोव्हेंबर रोजी होणार आहे.
0 टिप्पण्या