Ticker

6/recent/ticker-posts

निलेगाव येथील असंख्य कार्यकर्त्यांनी केला राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये जाहीर प्रवेश

निलेगाव येथील असंख्य कार्यकर्त्यांनी केला राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये जाहीर प्रवेश

राष्ट्रवादी काँग्रेस अल्पसंख्यांक विभागच्या तुळजापूर तालुका उपाध्यक्षपदी बाबूलाल मेहबूब शेख यांची निवड

तुळजापूर तालुका प्रतिनिधी : प्रतिक भोसले 

तुळजापूर : आज ( दि. १६ ) तुळजापूर तालुक्यातील निलेगाव येथे अल्पसंख्यांक विभागाचे उस्मानाबाद जिल्हाध्यक्ष असद पठाण, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे मा. मलंग भाई शेख, अल्पसंख्यांक जिल्हा कार्याध्यक्ष तौफिक शेख, अल्पसंख्यांक तुळजापूर तालुका अध्यक्ष फिरोज भाई पठाण, अल्पसंख्यांक तुळजापूर शहराध्यक्ष वाहेद भाई शेख, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे तुळजापूर शहर उपाध्यक्ष मकसूद भाई शेख यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये निलेगाव येथील असंख्य मुस्लीम कार्यकर्त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये जाहीर प्रवेश केला. 

त्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेस अल्पसंख्यांक विभागाचे तुळजापूर तालुका उपाध्यक्षपदी बाबूलाल मेहबूब शेख यांची निवड राष्ट्रवादी काँग्रेस अल्पसंख्यांक विभागाचे उस्मानाबाद जिल्हाध्यक्ष असद पठाण, जिल्हा कार्याध्यक्ष तोफिक शेख, तालुका अध्यक्ष फिरोज पठाण, तसेच मलंग भाई शेख यांच्या शुभ हस्ते नियुक्तीपत्र देऊन निवड करण्यात आली व त्यानंतर त्यांचा सत्कार पुष्पगुच्छ देऊन करण्यात आला व सर्व मान्यवराच्या वतीने पुढील कार्यास शुभेच्छा देण्यात आले.

निलेगाव मधील असंख्य कार्यकर्त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये प्रवेश केल्यामुळे त्या ठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची मोठी फळी निर्माण झाली आहे. सर्व प्रवेश करणाऱ्यांमध्ये युवक मोठा प्रमाणात दिसून आले आहे. यामध्ये सत्तार पटेल, शाहरुख पटेल, मुन्ना शेखदार, अर्षद पटेल, शहबाज शेखदार, सकलेन पठाण, अब्दुल रिसालदार, पापा इनामदार, नबी पटेल, सैपन पटेल, जुम्मा पटेल, शहबाज शेख, इस्माईल कुरणे, महेबुब शेख, इम्रान शेखदार, सदाम पटेल, सादीक पटेल तसेच अनेक तरुणांनी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये जाहीर प्रवेश केला आहे. 

नूतन तालुका उपाध्यक्षपदी निवड होताच त्यांनी असे सांगितले की यापुढे होणारी पंचायत समिती, जिल्हा परिषद निवडणुकीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला कशा पद्धतीने निवडून आणता येईल. यासाठी सर्व कार्यकर्ते प्रयत्न करतील व राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा उमेदवार निवडून आणतील याची मी गवाई देतो.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या