Ticker

6/recent/ticker-posts

वात्सल्य व जन-आधार सामाजिक संस्था मधले खरे रिअल हिरो : प्रसिद्ध अभिनेते मकरंद अनासपुरे


उस्मानाबाद जिल्हा प्रतिनिधी : रुपेश डोलारे

मंगरूळ:-आम्ही चित्रपटातील रील हिरो तर वात्सल्य व जन-आधार सामाजिक संस्था या खऱ्या रीअल हिरो आहेत असे गौरवोद्गार प्रिसिजनच्या पुरस्कार वितरण प्रसंगी प्रसिद्ध अभिनेते मकरंद अनासपुरे यांनी काढले.

प्रिसिजन फाउंडेशन तर्फे शिवछत्रपती रंगभवन सभागृह सोलापूर येथे शुक्रवारी सायंकाळी “प्रिसिजन गप्पा 2022” चे आयोजन केले होते.याप्रसंगी प्रेषित रुद्रवार यांनी सिने अभिनेते मकरंद अनासपुरे यांची दिलखुलास गप्पा मध्ये मुलाखत घेतली.यावेळी व्यासपीठावर प्रिसिजन फाऊंडेशनच्या अध्यक्षा डॉ.सुहासिनी शहा,प्रिसिजन उद्योग समूहाचे चेअरमन यतीन शहा,करण शहा,मयुरा शहा,पुरस्कार प्राप्त मान्यवर उमाकांत मिटकर,संजय कांबळे यांची प्रमुख उपस्थिती होती.

यावेळी अभिनेते मकरंद अनासपुरे यांच्या हस्ते प्रिसिजन सामाजिक कृतज्ञता पुरस्कार हा लातूर येथील जन-आधार सेवाभावी संस्थेचे संजय कांबळे यांना देण्यात आला.त्यांना सन्मानचिन्ह,तीन लाख रुपये आणि रोप देऊन गौरविले तर स्व. सुभाष रावजी शहा स्मृती पुरस्कार हा वात्सल्य सामाजिक संस्था,मंगरुळ ता.तुळजापूर जि.धाराशिव संस्थेच्या उमाकांत मिटकर यांना देण्यात आला. त्यांना सन्मान चिन्ह व दोन लाख रुपये व रोप देऊन गौरविले.

औरंगाबाद पासून ते मुंबई पर्यंतचा जीवन प्रवास श्री.अनासपुरे यांनी दिलखुलासपणे प्रेक्षकांना सांगितला.सुरुवातीच्या काळात नाटकांमध्ये काम करताना,घडलेल्या गमतीजमती ऐकताना सोलापूरकर खळखळून हसले,त्याच वेळी मुंबईत कलाकरांना करावे लागणारे कष्ट आपल्या विनोदी शैलीत सांगितले.नाम फाउंडेशन च्या माध्यमातून सुरू असलेल्या सामाजिक कामाचे अनुभवही त्यांनी सांगितले.श्री.माधव देशपांडे यांनी खुमासदार शैलीत सूत्रे सांभाळली.यावेळी कार्यक्रमासाठी शहरातील विविध क्षेत्रातील मान्यवरांची व रसिकांची तुडुंब गर्दी होती.

वात्सल्यचे कार्य आणि गाईसाठी प्रतीक्षा

आंधळ्या-अपंग-गायी घेऊन गो-शाळा सुरू केली त्यांची संख्या वाढूच लागली समाजात वृद्धाश्रम-गोशाळा वाढणे उचित नाही म्हणून समुपदेशनाचे काम हाती घेतले,शेतकऱ्यांना विषमुक्त शेतीसाठी गायी कशा उपयोगी आहेत हे पटवून दिले. तज्ञांचे मार्गदर्शन सुरू केले.यासाठी 16 कार्यकर्ते विनामोबदला काम करतात.या सर्व परिणामामुळे शेतकरी गोशाळेतील गायींना घेण्यासाठी येऊ लागले.शेणखताचे प्रशिक्षण दिले.विषमुक्त शेती करण्यास सुरुवात झाली.देवराई-वनराई निर्माणाचे काम हाती घेतले.आज परिस्थिती अशी आहे की गोशाळेतील गाईंसाठी प्रतीक्षा करावी लागते.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या