Ticker

6/recent/ticker-posts

उस्मानाबाद जिल्हा प्रशासनाच्या रोजगार मेळाव्याला मोठा प्रतिसाद ; १९ कंपन्यानी घेतल्या ११७४ जणांच्या मुलाखती ४९८ जणांची प्रथम फेरी निवड


उस्मानाबाद जिल्हा प्रतिनिधी : रुपेश डोलारे

उस्मानाबाद: उस्मानाबाद येथे कौशल्य, रोजगार, उद्योजकता व नाविन्यता विभाग आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ उप परिसर यांच्या संयुक्त विद्यमाने रोजगार मेळाव्याचे आयोजन विद्यापीठ उप-परीसरात दि. १४ ऑक्टोबर २०२२ रोजी करण्यात आले. या रोजगार मेळाव्याचे एकूण १९ कंपनीच्या १०२४ जागांसाठी आयोजन करण्यात आले. या रोजगार मेळाव्याचे उदघाटन खासदार ओमराजे निंबाळकर यांच्या हस्ते झाले.यावेळी जिल्हाधिकारी डॉ. सचिन ओम्‍बासे, जि. प. मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. राहुल गुप्ता, विद्यापीठ उप-परिसर संचालक डी. के. गायकवाड, कौशल्य विकास विभागाचे सहाय्यक आयुक्त संजय गुरव, जिल्हा व्यवसाय व प्रशिक्षण अधिकारी आवताडे, व्यवस्थापन शास्त्र विभागाचे संचालक डॉ. सुयोग अमृतराव, रिजवान कपूर आदी उपस्थितीत होते. प्रमुख पाहुण्यांनी उस्मानाबाद परिसर आणि येथील जमेची बाजू बाबत मार्गदर्शन केले. तर जिल्हाधिकारी यांनी मिळेल त्या संधीचे रुपांतर यशा मध्ये करा असे युवकांना सांगितले आणि प्रोत्साहन दिले.  

संजय गुरव यांनी कार्यक्रमाचे प्रास्ताविक केले. द्वितीय सत्रात मेळाव्यास आमदार राणा जगजीतसिंह पाटील, नितीन काळे यांनी भेट देऊन कंपनी प्रतिनिधी आणि विद्यार्थी यांच्याशी चर्चा केली. मान्यवरांच्या हस्ते नियुक्त झालेल्या विद्यार्थ्याला नियुक्ती पत्र देखील देण्यात आले.

या रोजगार मेळाव्यात विविध इंडस्ट्रीजचे प्रतिनिधी उपलब्ध होते, यांच्या मार्फत मुलाखती साठी येणाऱ्या विद्यार्थी आणि सहभागींना इंडस्ट्री जमधील आवश्यकता, मुलाखत देण्याबाबत मार्गदर्शन तसेच मार्केट मधील गरजा सांगण्यात आल्या. या रोजगार मेळाव्यात १०२४ पदांसाठी १९ कंपनी यात सहभागी झाल्या होत्या. यामध्ये एक्सलंट टीचर, सवेरा ऑटो, ऐडलर बायो एनर्जी, गुड वेअर, लक्ष्मी अग्री, एन. आय आय टी फॉर आय सी आय सी आय, पेटीएम, जस्ट डायल, बालाजी अमायींस, समृद्धी गारमेंट, क्रीडीत अक्सेस, पिगिओ व्हीईकल, नव भारत, धुत ट्रान्स्मिशन, डी आर पैकिंग, ऑर्डर टेक, रघुवीर बजाज, टळेनसेतू एमजीबीएम असोसिएट्स या कंपन्या या रोजगार मेळाव्यात उपस्थित होत्या. मेळाव्यासाठी ७४२ मुलाखत दारांनी नोंदणी केली आणि ११७४ जणांनी मुलाखती दिल्या. यामधील ४९८ जण प्रथम फेरी निवड आणि २९४ जणांची अंतिम निवड करण्यात आली. या मेळाव्याचे वैशिष्ट्य म्हणजे २१ मुलाखत दारांना नियुक्ती पत्र देखील देण्यात आले. रोजगार मेळाव्याचा प्रचार आणि प्रसार सोशल मीडिया तसेच विद्यापीठ आणि महाविद्यालयातून केला गेला होता. या मध्ये आय.टी.आय, एम एस सी, अभियांत्रिकी, एम बी ए ई. पर्यंत शिक्षण असणाऱ्या विद्यार्थ्यास संधी होती.

या रोजगार मेळाव्याची सांगता ही या सर्व रोजगार मेळाव्याच्या व्यवस्थापनात कार्य केलेल्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ उप परिसर उस्मानाबाद येथील सर्व विभाग, शिक्षक, शिक्षकेत्तर कर्मचारी, विद्यार्थी तसेच कौशल्य विभाग कर्मचारी यांना प्रमाणपत्र देऊन सत्कार करण्यात आला. उदघाटन समारंभाचे सूत्रसंचालन डॉ. विक्रम शिंदे यांनी केले आणि रिजवान कपूर यांनी आभार मानले. रोजगार मेळाव्याच्या नियुक्ती पत्र वाटप सत्रातील कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. सचिन बस्सैये तर आभार प्रा. वरून कळसे यांनी मानले.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या