उस्मानाबाद जिल्हा प्रतिनिधी : रुपेश डोलारे
तुळजापूर : तुळजापूर येथे तालुका विधी सेवा समिती, तुळजापूर व पंचायत समिती, तुळजापूर यांच्या संयुक्त विदयमाने दि. १२ नोव्हेंबर रोजी येणा-या 'राष्ट्रीय लोकअदालत' संबंधी विषयांवर चर्चा व मार्गदर्शनपर बैठक दि. १८ ऑक्टोबर रोजी पंचायत समिती येथील सभागृहात दुपारी २.०० वाजता पार पडली. सदर बैठकीच्या अध्यक्ष स्थानी मा. एम. एम. निकम, अध्यक्ष, तालुका विधी सेवा समिती तथा दि. न्या. क. स्तर, तुळजापूर उपस्थित होते. प्रमुख उपस्थिती म्हणून मा. प्रशांतसिंह मरोड, गटविकास अधिकारी, पंचायत समिती, तुळजापूर व मा. मोहन राऊत, सहा. गटविकास अधिकारी, पंचायत समिती, तुळजापूर हे उपस्थित होते. जवळपास ४० ग्रामपंचायती मधील ग्रामसेवक व सरपंच मोठया संख्येने या बैठकीस उपस्थित राहिले होते.
लोकअदालतमध्ये वादपूर्व प्रकरणे तडजोडीने मिटवणेकामी ठेवणेबाबतचे विषयांवर चर्चा करण्यात आली. एम. एम. निकम, अध्यक्ष, तालुका विधी सेवा समिती तथा दि. न्या. क. स्तर, तुळजापूर यांनी गावातील सरपंच, ग्रामपंचायत सदस्य व नोकरदारवर्ग यांचेकडून प्रथम प्राधान्याने थकबाकी वसूल करणे संबंधी सर्व ग्रामसेवक यांना सूचित केले. तसेच वादपूर्व प्रकरणात लोकअदालतचे अनुषंगाने न्यायालयामार्फत नोटीस पाठविले नंतर सदर थकबाकीची रक्कम संबंधित ग्रामपंचायत येथे जमा केली जाते. त्याबाबतचा अहवाल लोकअदालतपूर्वी न्यायालयास सादर करावे असे सूचित केले. तदनंतर सर्व ग्रामसेवक यांना दि. १२ नोव्हेंबर २०२२ रोजीचे 'राष्ट्रीय लोकअदालत' बाबतचे जाहिरात वाटप करुन ती संबंधित ग्रामपंचायतीवर डकविणेकामी देण्यात आले.
सदर बैठकीस मा. गटविकास अधिकारी, पं. स. तुळजापूर, सहा. गटविकास अधिकारी, पं. स. तुळजापूर, ग्रामसेवक, सरपंच आणि न्यायालयीन कर्मचारी उपस्थित होते.
0 टिप्पण्या