महाराष्ट्र राज्य प्रतिनिधी : राम थोरात
तुळजापूर : तुळजापूर तालुक्यातील अन्न व नागरी पुरवठा विभाग तहसील कार्यालय तुळजापूर यांचे मार्फत तालुक्यातील सर्व रेशन दुकानातून दिवाळी सणाच्या पार्श्वभूमीवर राज्य शासनाने उपलब्ध करून दिलेला आनंदाचा शिधा म्हणजेच शंभर रुपयांमध्ये एक किलो साखर ,एक किलो चणाडाळ ,एक किलो रवा आणि एक किलो पामतेल असे चार शिधा जिन्नस उपलब्ध करून दिले जाणार आहे असे पुरवठा निरीक्षक संदीप जाधव यांच्या वतिने सांगण्यात आले आहे.
सदर शिधाजिन्नसांची किट ही अंतोदय लाभार्थी , प्राधान्य लाभार्थी आणि शेतकरी योजनेचे लाभार्थी या तिन्ही योजनेस हे वाटप करण्यात येणार आहे.
तालुक्यातील जवळपास ४५ हजार रेशन कार्डधारकांना सदर योजनेचा लाभ मिळणार आहे. त्यात अंतोदय योजनेचे ४९८६ रेशन कार्ड , प्राधान्य योजनेचे २९८७७ रेशन कार्ड व शेतकरी योजनेचे ११०३० रेशन कार्ड अशी एकूण ४५ हजार ८९३ रेशन कार्ड धारकांना " आनंदाचा शिधा " या योजनेचा लाभ मिळणार आहे.
ज्या नागरिकांना पात्र असूनही " आनंदाचा शिधा " योजनेचा लाभ न मिळाल्यास जिल्हा स्तरावरील तक्रार क्रमांक ०२४७२२२७३०५ हा नंबर उपलब्ध करून देण्यात आला आहे. त्या द्वारे त्यांच्या तक्रारींचे निरसन करण्यात येणार आहे. अशी माहीती तुळजापूर तालुकाचे पुरवठा निरीक्षक संदीप जाधव यांनी दिली आहे.
0 टिप्पण्या